Home » लग्नाआधीच ‘या’ अभिनेत्री झाल्या होत्या गरोदर,८ नंबरच्या अभिनेत्रीचे नाव ऐकून बसेल धक्का…
Entertainment

लग्नाआधीच ‘या’ अभिनेत्री झाल्या होत्या गरोदर,८ नंबरच्या अभिनेत्रीचे नाव ऐकून बसेल धक्का…

चित्रपट कलाकारांच्या बातम्या लगेचच माध्यमांमध्ये वाऱ्यासारख्या पसरतात.मग ते व्यावसायिक आयुष्याशी संबंधित असो किंवा वैयक्तिक आयुष्याशी.त्याचबरोबर इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधीच प्रेग्नंट झाल्या होत्या.या यादीत अनेक अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे.तर आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल बघणार आहोत ज्या लग्नाआधी प्रेग्नंट होत्या.

१) कल्कि कोचलीन : कल्की अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये दिसली आहे.अनुराग कश्यपपासून वेगळे झाल्यानंतर ती इस्रायली शास्त्रीय पियानोवादक गाय हर्शबर्गला डेट करत आहे.कल्कीनेही तिच्या प्रेग्नेंसीची बातमी देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.तिने लग्न न करता मुलाला जन्म दिला.

२) गॅब्रिएला डेमेट्रिड्स : अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने लग्नाआधीच मुलाला जन्म दिला होता.अर्जुनच्या मुलाचे नाव अरिक रामपाल आहे.स्वतः अर्जुनने गर्लफ्रेंड गॅब्रिएलाच्या प्रेग्नेंसीची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.या दोघांनी अद्याप लग्न केलेले नाही. गॅब्रिएलाला डेट करण्यापूर्वी अर्जुन रामपालने मेहर जेसियाशी लग्न केले,पण लग्नाच्या २० वर्षानंतर दोघेही वेगळे झाले.

३) एमी जॅक्सन : सिंग इज ब्लिंग आणि अभिनेता अक्षय कुमार सोबत २.० या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री एमी जॅक्सन देखील तिच्या लग्नाआधीच गरोदर राहिली आणि तिला मुलगा झाला.एमी जॅक्सनने अद्याप बॉयफ्रेंड जॉर्जसोबत लग्न केले नसले तरी ती त्याच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहत आहे

४) लिसा हेडन : लिसा क्वीन, हाऊसफुल-3 आणि आयशा या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे.लिसा हेडनने खुलासा केला की ती तिच्या लग्नाआधी गर्भवती होती.तिने २०१६ मध्ये बॉयफ्रेंड दिनो लालवानीसोबत लग्न केले. लिसा हेडन आता दोन मुलांची आई आहे आणि लवकरच ती तिसर्‍या मुलाला जन्म देणार आहे.

४) कोंकणा सेन शर्मा :  बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे. कोंकणा सेन शर्माने अभिनेता रणवीर शौरीसोबत लग्न केले होते.शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.कोंकणा सेन शर्मा लग्नाआधीच प्रेग्नंट झाली होती. कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरी यांनी २०१० मध्ये लग्न केले आणि सहा महिन्यांनंतर कोंकणाने मुलगा हारूनला जन्म दिला.मात्र,आता कोंकणा सेन शर्मा रणवीर शौरीपासून वेगळी झाली आहे.

५) नताशा स्टॅनकोविक : नताशा स्टॅनकोविकने गेल्या वर्षी क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत लग्न केले.विशेष म्हणजे नताशा लग्नाआधीच प्रेग्नंट राहिली होती.दोघांनी लग्नाआधीच प्रेग्नन्सी जाहीर केली होती.

६) श्रीदेवी : दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी देखील बोनी कपूर यांच्याशी लग्न करण्यापूर्वी गरोदर होत्या.मात्र,श्रीदेवीने ही बातमी मीडियापासून कधीच लपवून ठेवली नाही आणि स्वतः खुलासा केला.बोनी कपूर यांचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोटही झाला नव्हता तेव्हा श्रीदेवी गरोदर होत्या.नंतर दोघांनी १९९६ मध्ये लग्न केले आणि काही महिन्यांनंतर श्रीदेवीच्या पहिल्या मुलीचा जन्म झाला.

७) सारिका हसन : सारिका ही अभिनेता कमल हसनची दुसरी पत्नी आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार,कमल हसनने पत्नीला तलाकही दिला नाही तेव्हा सारिका गरोदर राहिली पण तरीही दोघे एकत्र राहत होते.त्यानंतर त्यांची पहिली मुलगी श्रुती हसनचा जन्म झाला.यानंतरही या दोघांनीही खूप दिवसांनी लग्न केले आणि लग्नानंतर सारिकाची दुसरी मुलगी अनुष्का हसनचा जन्म झाला.

८) महिमा चौधरी : महिमा चौधरी ही अशी अभिनेत्री आहे जिच्या प्रेमात बॉयफ्रेंड बनवण्यापासून ते नाते तुटण्यापर्यंतच्या सगळ्या बातम्या मीडियात वाऱ्यासारख्या पसरल्या.पण अचानक २००६ मध्ये तीच्या लग्नाने प्रेक्षकांना धक्का दिला होता. एवढेच नाही तर लग्नानंतर काही महिन्यांनी तीच्या मुलीचा जन्म झाला.ज्यावरून ती लग्नापूर्वी गरोदर असल्याचे स्पष्ट झाले होते.