Home » लवकरच शाहरुख खानची मुलगी सुहाना खान होणार ‘या’ घरची सून…
Entertainment

लवकरच शाहरुख खानची मुलगी सुहाना खान होणार ‘या’ घरची सून…

शाहरुख हा बॉलीवुड मधील सुपरस्टार आहे.त्याला त्याच्या लोकप्रियतेमुळे किंग खान असेही म्हटले जात.त्याच्या पिढीतील सर्वच अभिनेत्यां पेक्षा शाहरूखने खूप जास्त यश मिळवले आहे.शाहरुख खानला कोणतीही फिल्मी पार्श्‍वभूमी नसताना त्याने हे यश मिळवले हे विशेष.शाहरूखच्या अभिनय कौशल्यामुळे त्याचे फॅन्स केवळ भारतामध्येच नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा आहेत.शाहरुख खान हा नेहमीच प्रसारमाध्यमाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला असतो.सध्या सोशल मीडियावर शाहरुख खान खूप चर्चेत आहे.

आपल्या अभिनयामुळे किंवा ग्लॅमर मुळे शाहरुख खान नेहमी चर्चेत असतो मात्र यावेळी शाहरुखच्या चर्चेचे कारण त्याची लाडकी मुलगी सुहाना आहे.सुहाना खान ही सध्या एका मुलाला डेट करत आहे व तिची काही छायाचित्रे या मुलासोबत व्हायरल झाली आहेत.या छायाचित्रांवरून असे म्हटले जात आहे की लवकरच सुहाना चंकी पांडे या अभिनेत्याच्या घरची सून बनणार आहे.सुहाना खान ज्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे तो मुलगा नक्की कोण आहे ज्यामुळे असे म्हटले जाते की सुहाना चंकी पांडेच्या घरची सुन होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

सुहाना खान तिच्या रिलेशनशिप मुळे चांगलीच चर्चेत आहे.सुहाना ज्या मुलाला डेट करत आहे तो मुलगा म्हणजे चंकी पांडे च्या छोट्या भावाचा मुलगा आहान पांडे असून अनन्या पांडेचा तो चुलत भाऊ आहे.सुहाना व अहान गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत व हे दोघे सुद्धा या रिलेशनशिप च्या बाबतीत खूप गंभीर आहेत.चंकी पांडेच्या भावाचा मुलगा असल्यामुळे आता सुहाना चंकी पांडे च्या घरची सुन होणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.येत्या काही दिवसांमध्ये सुहाना खान व अहान पांडे हे दोघेजण एकत्र चित्रपटामध्येही डेब्यू करणार आहेत.या दोघांच्या रिलेशनशिप बद्दल बॉलीवूडमध्ये सर्वांनाच माहिती आहे व म्हणूनच या दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे.