Home » वेटर ते बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध सुपरस्टार! असा होता अक्षय कुमारचा संघर्षमय प्रवास…
Entertainment

वेटर ते बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध सुपरस्टार! असा होता अक्षय कुमारचा संघर्षमय प्रवास…

आपले करियर बनवण्यासाठी देशभरातून कलाकार मुंबईमध्ये येत असतात.दरवर्षी स्वप्नांची दुनिया मानल्या जाणाऱ्या मायानगरी मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने कलाकार येत असतात. यांपैकी काही मोजके कलाकार आपल्या कष्ट व संघर्षाने फिल्मी दुनिया मध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.मात्र बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावणे अगोदर या कलाकारांना किती मोठा संघर्ष करावा लागला आहे हे खूप कमी जणांना माहीत आहे.

बॉलीवूड मध्ये नवीन येणाऱ्या कलाकारांसाठी अक्षय कुमार हा नायक जणू प्रेरणास्रोत आहे.बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर सुरुवातीच्या काळात अक्षयकुमारने खुप संघर्ष केला.मात्र त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. आज तो यशस्वी कलाकारांच्या यादी मध्ये सामील झाला आहे.अक्षयने सुरुवातीच्या काळामध्ये बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत.

बॉलीवूड मध्ये येण्यासाठी अक्षयकुमारला कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. कोणतेही फिल्मी पार्श्वभूमी नसताना अक्षय कुमार गेली तीन दशके आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

बॉलीवूडमध्ये येण्याअगोदर अक्षय कुमार बँकॉक येथे एका रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम करत होता .मात्र आपल्या कामाने तो संतुष्ट नव्हता. त्याला अजून काहीतरी मोठे आपल्या आयुष्यामध्ये करायचे होते म्हणूनच त्याने साऊंड मार्शल आर्टचे ट्रेनिंग घेतले.अक्षय कुमार इतक्यावरच थांबला नव्हता.

आपले भविष्य ओळखून त्याने बँकाक मधून भारतामध्ये परतण्याचा निर्णय घेतला व भारतामध्ये येऊन त्याने बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावण्यास सुरुवात केली. अक्षयने 1991 साली सौगंध या चित्रपटाद्वारे  बॉलीवूडमध्ये पदार्पण केले व या चित्रपटानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट अक्षय ने बॉलिवूडमध्ये दिले आहेत.