Home » सचिन तेंडुलकरच्या मुलीची मॉडेलिंग क्षेत्रात एन्ट्री,व्हिडिओ व्हायरल…
Entertainment

सचिन तेंडुलकरच्या मुलीची मॉडेलिंग क्षेत्रात एन्ट्री,व्हिडिओ व्हायरल…

माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने अखेर मॉडेलिंग क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे.सारा तेंडुलकरने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे,ज्यामध्ये ती एका कंपनीच्या जाहिरातीत दिसत आहे.साराने एका कपड्याच्या ब्रँडची जाहिरात केली आहे.सारा तेंडुलकर सतत तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये सारा तेंडुलकरसोबत आणखी दोन मॉडेल्सही दिसत आहेत.सारा तेंडुलकरला लॉन्च करतानाचा एक फोटोही कंपनीच्या वतीने पोस्ट करण्यात आला आहे.सारा तेंडुलकरने मॉडेलिंग व्हिडिओने बनिता संधू आणि तानिया श्रॉफ या अभिनेत्रींसोबत मॉडेलिंगमध्ये पदार्पण केले.

कपड्यांच्या ब्रँडच्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये तिघीही एकत्र पोज देताना दिसत आहेत.यामध्ये सारा खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.या व्हिडिओमध्ये,ती तलावावरील एका छोट्या पुलावर आणि दाट झाडांच्या आसपास मॉडेलिंग करताना दिसत आहे.यामध्ये सारा तेंडुलकर खूपच स्टनिंग लूकमध्ये दिसत आहे.अलीकडेच सारा तेंडुलकरचा खास डेट नाईटचा फोटोही व्हायरल झाला होता.ज्यामध्ये ती बॉलिवूड गायिका कनिका कपूरसोबत दिसली होती.

सारा तेंडुलकर बहुतेक लंडनमध्ये राहते,जिथून ती सतत तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.सारा तेंडुलकरने नुकतेच तिच्या कुटुंबासोबत खास डिनरही केले. साराचे वडील सचिन तेंडुलकर यांनी हा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी अंजली तेंडुलकरचा वाढदिवस साजरा करताना डिनरचा फोटो शेअर केला आहे.