Home » सलमानच्या ‘या’ अभिनेत्रीचे प्लॅस्टिक सर्जरी नंतर झाली अशी अवस्था, ओळखणे ही झाले कठीण!
Celebrities Entertainment

सलमानच्या ‘या’ अभिनेत्रीचे प्लॅस्टिक सर्जरी नंतर झाली अशी अवस्था, ओळखणे ही झाले कठीण!

वॉन्टेड’, ‘दिल मांगे मोर’, ‘शादी नंबर-1’, ‘शादी से पहले’, ‘कैश’, ‘पाठशाला’  आणि ‘दे ताली चित्रपटांमधून अभिनय केलेली अभिनेत्री आयेशा टाकियाने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला आहे. आयशा टाकिया 35 वर्षांची झाली आहे.आयेशा सध्या चित्रपट सृष्टी पासून दूर असली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपला चाहत्यांशी संपर्कात असते. आयेशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण तिच्याशी निगडित काही तथ्य जाणून घेऊया.आयेशा ने वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले.तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे.

मेरी चुनर उड जाये या फाल्गुनी पाठक यांच्या म्युझिक अल्बम मध्ये आयेशा दिसली होती व या अल्बम नंतरच तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. वयाच्या पंधराव्या वर्षी आयेशाला चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

म्युझिकल अल्बम व जाहिराती मध्ये काम करणाऱ्या आयेशाचे अभिनय कौशल्य  निर्माता-दिग्दर्शकांनी ओळखले व टार्जन द वंडर कार या चित्रपटाद्वारे तिने प्रमुख  भूमिकेमध्ये पदार्पण केले व या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट नवोदित अभिनेत्री चार पुरस्कारही मिळाला.

या चित्रपटानंतर आयेशाने डोर या चित्रपटामध्ये काम केले होते. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. सलमान खान सोबतचा वांटेड चित्रपट हा तिचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला.

2000 सालापासून ते आत्तापर्यंत आयेशाच्या लूकमध्ये प्रचंड बदल झाल्याचे दिसून आले आहे. असे सांगितले जाते की तिने आपल्या ओठांची, कपाळ आणि भुवयांची प्लास्टिक सर्जरी करून घेतले आहे.आयेशाने वयाच्या बावीसाव्या वर्षी राजकीय नेते अबू आझमी यांच्या मुलासोबत लग्नाची गाठ बांधले.फरान सोबत विवाह करण्यासाठी आयेशाने धर्मांतर केले.

आयेशा सध्या बॉलीवूड मधील चित्रपटांमध्ये दिसत नाही मात्र ती सोशल मीडियावर सक्रिय असते. आयेशाला आता एक मुलगा सुद्धा आहे.ती नेहमीच आपल्या मुला सोबतची छायाचित्रे इंस्टाग्राम वर शेअर करत असते. या छायाचित्रांचा चाहते खूप लाईक करतात. मात्र त्याचबरोबरीने प्लास्टिक सर्जरी मुळे तिच्या लूकमध्ये जो फरक पडला आहे त्यामुळे तिला ट्रोलिंगसुद्धा सहन  करावे लागते.