Home » “साक्षात परमेश्वर माझ्या ब्रा चे माप घेतो”,असे विधान केल्यानंतर श्वेता तिवारी ने मांडली स्वतः ची बाजू…
Entertainment

“साक्षात परमेश्वर माझ्या ब्रा चे माप घेतो”,असे विधान केल्यानंतर श्वेता तिवारी ने मांडली स्वतः ची बाजू…

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या आगामी वेबसिरीज शो स्टॉपर च्या प्रमोशनच्या वेळी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज समोर येत तिने आपली या विधाना संदर्भातील बाजू मांडली आहे.श्वेता तिवारीने या प्रमोशनच्या वेळी असे म्हटले होते की साक्षात देव माझ्या ब्रा ची साईज घेत आहे.या वादग्रस्त विधानाच्या संदर्भात पोलिसांना अधिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

या वादग्रस्त वक्तव्यानंतर श्वेता ला सर्व बाजूंनी ट्रोल केले जात आहे.आपली बाजू मांडत असताना तिने असे म्हटले आहे की माझ्या असे लक्षात आले आहे की मी प्रमोशन च्या वेळी बोललेली काही विधाने ही चुकीच्या पद्धतीने प्रसारमाध्यमांनी समोर आणली आहेत. या प्रमोशनच्या वेळी आपण एका सहकलाकाराबद्दल बोललेली वाक्य अतिशय संदर्भहीन पद्धतीने बातमीच्या स्वरूपात सर्वत्र व्हायरल झाल्याचे तिचे म्हटले आहे.

या ठिकाणी भगवान किंवा परमेश्वर हे आपण आपला सहकलाकार असलेल्या सौरभ राज जैन यांनी साकारलेल्या देवाच्या भूमिकेबद्दल बोलल्याचे तिने सांगितले आहे व प्रेक्षक परमेश्वराच्या भूमिका साकारणारा अभिनेत्यांना साक्षात परमेश्वरच समजू लागतात असे आपल्याला म्हणायचे होते असे तिने सांगितले आहे.श्वेताने असे म्हटले आहे की मी स्वतः देवावर खूप श्रद्धा ठेवते व देवावर इतकी श्रद्धा असलेली व्यक्ती हेतुपूर्वक किंवा कोणत्याही  हेतुशिवाय देवाबद्दल असे विधान करून इतरांच्या भावना दुखावू शकत नाही.

मात्र माझ्याकडून नकळत अशा विधानांमुळे किंवा कृतीमुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागते.श्वेताच्या शो स्टॉपर या वेब सिरीजच्या प्रमोशनच्या वेळी तिच्यासोबत सौरभ राज जैन हा अभिनेता ही उपस्थित होता.सौरभ राज जैन त्यांनी महाभारत या मालिकेमध्ये साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय आहेत.शो स्टॉपर या वेब सिरीजमध्ये सौरभने ब्रा फिटरची भूमिका केली आहे व या भूमिकेच्या संदर्भात श्वेताने विनोदाच्या अंगाने हे विधान केले होते असे तिचे म्हणणे आहे.