Home » सीआयडी मालिकेतील इन्स्पेक्टर दयाची अवस्था झाली आहे अशी की ओळखणेही झाले मुश्किल…
Entertainment

सीआयडी मालिकेतील इन्स्पेक्टर दयाची अवस्था झाली आहे अशी की ओळखणेही झाले मुश्किल…

बॉलीवुड ही एक अस्थिर व मोहमयी दुनिया आहे.बॉलिवूडमध्ये काही कलाकारांना एका रात्रीत अगदी सुपरस्टार बनवले जाते, सगळे जग त्यांना ओळखू लागते व काम मिळवण्यासाठी कोणाच्याही ओळखीची गरज त्यांना राहत नाही.मात्र हे सुद्धा सत्य आहे की सर्वसामान्य लोकांप्रमाणेच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना सुद्धा अशा काळाचा सामना करावा लागतो जेव्हा त्यांचे वाईट दिवस सुरू होतात व काम मिळवण्यासाठी त्यांना लोकांचे उंबरठे झिजवावे लागतात.

गेली अनेक वर्षे टेलिव्हिजनवर प्रसारित होणाऱ्या सीआयडी या मालिकेमध्ये पोलीस इन्स्पेक्टर दया ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता दयानंद शेट्टीची अवस्था सुद्धा सध्या अशीच आहे.सीआयडी ही मालिका गेली अनेक वर्षे लोकप्रिय मालिकांपैकी एक मानली जाते.एक काळ असा होता जेव्हा टेलिव्हिजनवर सीआयडी आणि तारक मेहता का उल्टा चश्मा या दोनच मालिका बघायला प्रेक्षकांना आवडत होते. सीआयडी मालिकेतील दयानंद शेट्टी यांनी साकारलेले इन्स्पेक्टर दया हे पात्र प्रेक्षकांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले होते व त्यामुळे दयानंद शेट्टी यांना सुद्धा खूप प्रसिद्धी मिळाली होती.

मात्र गेल्या तीन वर्षांपासून दयानंद यांची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे.2018 साली सिंघम रिटर्न्स या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.यानंतर त्यांना कोणतीही मालिका किंवा चित्रपटांमध्ये भूमिका मिळालेली नाही.यामुळे ते सध्या घरीच बसून आहेत. एक काळ होता जेव्हा दयानंद शेट्टी यांना लाखोंमध्ये मानधन मिळत होते.मात्र गेल्या तीन वर्षांमध्ये काम नसल्यामुळे त्यांच्याकडे सध्या पैशांची वाणवा आहे व त्यामुळे ते पूर्वीसारखे आयुष्य जगू शकत नाही.दयानंद शेट्टी यांना काम मिळवण्यासाठी अक्षरशः लोकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.