Home » सौंदर्याच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींना देखील टक्कर देते सुनील ग्रोव्हरची पत्नी…!
Entertainment

सौंदर्याच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींना देखील टक्कर देते सुनील ग्रोव्हरची पत्नी…!

द कपिल शर्मा या कार्यक्रमामध्ये गुत्थीचे पात्र साकारणारा अभिनेता सुनील ग्रोवर हा सर्वांना चांगलाच परिचित आहे.गुत्थी हे पात्र एका वेगळ्याच लोकप्रियतेच्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे श्रेय हे संपूर्णपणे सुनील ग्रोवरला आहे.त्यांनी आपल्या कल्पकतेने आणि अभिनयाच्या जोरावर या पात्राला प्रेक्षकांच्या मनामध्ये वसवले.केवळ गुत्थीचे पात्र नव्हे तर कपिल शर्मा शो मधील डॉक्टर गुलाटी हे पात्र सुद्धा सुनील ग्रोवर यांनी आपल्या अभिनयाने चांगलेच लोकप्रिय केले.सुनिल ग्रोवर यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे.

आपल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये यशस्वी ठरलेल्या सुनीलने आपले वैयक्तिक आयुष्य मात्र नेहमीच प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवले.आज आपण सुनील ग्रोवरच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही चर्चा आणि त्याच्या सुंदर पत्नी विषयी जाणून घेणार आहोत.सुनील खूप उत्तम अभिनेता असला तरीही ही गोष्ट सर्वांना ज्ञात आहे की सुनील ला त्याच्या कॉमेडी नाईट विथ कपिल या शोमधून साकारलेल्या गुत्थी आणि डॉक्टर गुलाटी या दोन पात्रां मुळेच खरी ओळख मिळाली आहे.सूनील ग्रोवर हा हरियाणातील सिरसा या गावातील असून सुरुवातीला बॉलिवूडमध्ये चित्रपटांतील छोट्या-मोठ्या भूमिका तो करत असे.

सुनीलचा पहिला चित्रपट प्यार तो होना ही था हा होता.या चित्रपटात त्याने साकारलेली छोटीशी भूमिका होती.त्यानंतर भगतसिंग चित्रपटांमधील सुद्धा सुनीलने काम केले होते.या छोट्याशा भूमिकांमध्ये सुद्धा सुनील ने उत्तम अभिनय केला होता.सुनिल आयुष्यामध्ये खूपच समाधानी असल्याचे दिसून येते.सुनीलच्या पत्नीचे नाव आरती ग्रोव्हर आहे‌.आरती ही पेशाने इंटिरिअर डिझायनर आहे.चित्रपटसॄष्टीपासून दुर असूनही आरतीचे व्यक्तिमत्त्व हे एखाद्या बॉलिवूड सेलिब्रिटीप्रमाणेच आहे.

आरतीला अगदी सुरुवातीपासूनच खूप साधेपणाने आयुष्य जगायला आवडते त्यामुळे ती नेहमीच प्रसारमाध्यमांच्या नजरेपासून दूर राहणेच पसंत करत असल्याचे दिसून येते.सुनिलच्या संघर्षाच्या काळात आरतीने त्याला खूप चांगल्या प्रकारे साथ दिली व आतासुद्धा दोघे मिळून आपला संसार व्यवस्थितपणे चालवत आहेत.आरती ही पेशाने इंटिरिअर डिझायनर असून ती स्वतंत्रपणे आपला व्यवसाय चालवते.आरतीने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची घरे डिझाईन केली आहेत.आरती ही आपल्या इन्स्टाग्रामवर आपली फारशी छायाचित्रे शेअर करताना दिसून येत नाही.

सुनील कधी कधी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून आरती ची छायाचित्रे शेअर करत असतो.सुनील आणि आरती या दोघांना मोहन हा मुलगा सुद्धा आहे.सुनील सोबत आरती अनेक सार्वजनिक ठिकाणी उपस्थित असते.काही प्रसंगी पुरस्कार सोहळ्यांमध्ये दिसून येते.सुनील ग्रोवर आरती यादव यांची लव्हस्टोरी खूपच साधी सरळ आहे.आपण आरतीच्या सौंदर्यावर फिदा झाल्याचे सुनील अगदी मनमोकळेपणाने सांगतो.आरती ही नेहमीच सुनील च्या व्यवसायिक आयुष्याबद्दल कोणतेही मतप्रदर्शन करण्यापासून दूर राहते.

मध्यंतरी कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर या दोघांमध्ये झालेले वाद व त्याचे सुनीलच्या या शोमधून बाहेर निघण्या पर्यंतच्या वादावर आरतीने कधीही कोणतीही टिप्पणी केले नाही.ती नेहमीच वादांपासून दूर राहिली.सुनीलने एका मुलाखतीमध्ये असे सांगितले होते की तो आपल्या विनोदी कार्यक्रमांमध्ये करत असलेले विनोद हे सर्वात आधी आरती समोर करून दाखवतो व तिला हसवण्यामध्ये जर तो यशस्वी झाला तर त्याच पद्धतीने तो आपल्या संवादांना कार्यक्रमामध्ये सादर करतो.