Home » ‘हा’ क्रिकेटपटू करतोय सुनील शेट्टीच्या मूलीला डेट, दिल्या अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा
Celebrities Entertainment Sports

‘हा’ क्रिकेटपटू करतोय सुनील शेट्टीच्या मूलीला डेट, दिल्या अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी ची मुलगी अथिया शेट्टी ही सध्या तिच्या अभिनय क्षेत्रातील करियर पेक्षा सुद्धा तिच्या लव लाईफ मुळे जास्त चर्चेत आहे.तिचं नाव गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघातील दमदार खेळाडू के एल राहुल त्या याच्या सोबत जोडले जात आहे.

दोघांची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर एकत्रितपणे उपलब्ध आहेत व त्यांच्या या छायाचित्रांमधील पोज वरून हा अंदाज केला जाऊ शकतो की ते दोघे एकमेकांच्या किती जवळ आहे. पण त्यांच्या या छायाचित्रांवरून या दोघांच्या संबंधांबद्दल चाहते अंदाज लावत होते. मात्र या दोघांनी कधीही समोर घेऊन आपल्या नात्याची अधिकृतपणे घोषणा केली नव्हती.

नुकताच आलियाने आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी अथियाला के एल राहुलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट करून एका वेगळ्याच अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. त्या वेळी त्याने अतिशय सुंदर असे छायाचित्र शेअर केले आहे. या छायाचित्रांमध्ये के एल राहुल व अथिया हे एकमेकांच्या खूप जवळ आहेत व एकत्र ते खुपच सुंदर दिसत आहेत.या छायाचित्राकडे पाहून या दोघांनी आपल्या नात्यावरती शिक्कामोर्तब केले आहे असे चाहत्यांनी म्हटले आहे.

अथिया शेट्टी हिने आत्तापर्यंत बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे मात्र तिला म्हणावे तसे यश मिळू शकले नाही.यामुळे ती  आपल्या करिअर पेक्षा देखील के एल राहुल सोबतच्या रिलेशनशिपमुळे सगळ्यात जास्त चर्चेत आहे त्यांची जवळीक क्रिकेट सामन्याच्या वेळी दिसून येत आहे. यावरूनच लवकरच हे दोघे विवाहबद्ध होतील असेही सांगितले जाते.