Home » ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता कंगना राणावत सोबत लग्न करण्यासाठी पत्नीला घटस्फोट द्यायला तयार होता…
Entertainment

‘हा’ प्रसिद्ध अभिनेता कंगना राणावत सोबत लग्न करण्यासाठी पत्नीला घटस्फोट द्यायला तयार होता…

बॉलीवूडची क्वीन,कंगना राणावत साठी सर्वच वेडे आहे…३४ वर्षांची कंगना सध्या सिंगल आहे आणि एखाद्या खास व्यक्तीची वाट पाहत आहे पण एक बॉलिवूड अभिनेता आहे जो कंगनाशी लग्न करण्यासाठी आपल्या पत्नीला देखील सोडायला तयार आहे.हा अभिनेता दुसरा कोणी नसून अनिल कपूर आहे.अनिल कपूर कंगना राणावत साठी आपल्या पत्नीला घटस्फोट देखील देऊ शकतो.याचा खुलासा खुद्द अनिल कपूरने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये केला होता.

अनिल त्याच्या बायकोला सोडून कंगनाशी लग्न करू शकतो,हो तुम्ही बरोबर ऐकले आहे.जेव्हा करण जोहरने अनिल कपूरला त्या एका महिलेचे नाव विचारले,जिच्यासाठी पत्नी सुनीता कपूरला सोडू शकता.यावर अनिलने कंगनाकडे बोट दाखवत तिचे नाव घेतले.आता अनिलने गमतीने कंगनाचे नाव घेतले असले तरी सोशल मीडिया यूजर्सला ट्रोल करण्यासाठी निमित्त हवे आहे.

कोण आहेत अनिल कपूरची पत्नी…

अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांनी १९८४ मध्ये लग्न केले होते.त्यावेळी सुनीता एक मॉडेल होती आणि तिचे वडील बँकर होते.त्याचवेळी अनिल कपूर इंडस्ट्रीत पाय रोवत होता.आता सुनीता पेशाने कोस्टुम डिझायनर आहे.दोघांना सोनम कपूर,रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर ही तीन मुलं आहेत. सोनम आणि हर्षवर्धन अभिनय क्षेत्रात आहेत. दुसरीकडे, रिया कपूर एक निर्माती आहे.

कंगनाचे आगामी चित्रपट…

कंगना राणावत तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते.कंगना राणावत तेजस,धडक,आणीबाणीसह अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे.काही काळापूर्वी कंगनाचा थलायवी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.हा चित्रपट कंगनाच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ओळखला जात आहे.