Home » खलनायक प्रेम चोप्रा यांचा जावई आहे बॉलिवूडचा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता…
Entertainment

खलनायक प्रेम चोप्रा यांचा जावई आहे बॉलिवूडचा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता…

बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी ४१ वर्षांचा झाला आहे. २८ एप्रिल १९७९ रोजी मुंबईत जन्मलेले शर्मन जोशी हे मराठी कुटुंबातील आहेत,परंतु त्यांचे वडील अरविंद जोशी हे गुजराती रंगभूमीचे ज्येष्ठ अभिनेते आहेत.शर्मनने १९९९ मध्ये आलेल्या ‘गॉडमदर’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती.मात्र,त्याला २००१ मध्ये आलेल्या ‘स्टाइल’ या चित्रपटातून ओळख मिळाली.नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘शिकारा’ चित्रपटात दिसलेला शर्मन जोशी हा प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्राचा यांचा जावई आहे.

३ इडियट्स’ आणि ‘फेरारी की सवारी’ सारख्या चित्रपटात काम केलेल्या शर्मन जोशीने कॉलेजमध्ये शिकत असतानाच आपल्या लव्ह लाईफला सुरुवात केली होती.येथे त्याला एक मुलगी भेटली जिला शर्मनने पहिल्याच भेटीत आपले हृदय दिले होते.त्या मुलीचे नाव प्रेरणा चोप्रा असून ती अभिनेता प्रेम चोप्रा यांची मुलगी आहे.

पहिल्या भेटीनंतर प्रेरणालाही शर्मन आवडला.मात्र,दोघांनीही एकमेकांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत. त्यानंतरही भेटीगाठी सुरूच राहिल्या आणि त्यांची चांगली मैत्री झाली.शर्मनला प्रेरणाचे गांभीर्य आणि वागणूक खूप आवडली.मात्र,दोघांनी कधीही एकमेकांना प्रपोज केले नाही.

१९९९मध्ये सुरू झालेली डेटिंगची मालिका २००० मध्ये संपली.यानंतर दोघांनी १५ जून २००० रोजी गुजराती रितीरिवाजांनुसार लग्न केले.ज्या वर्षी दोघांचे लग्न झाले त्याच वर्षी शर्मन जोशीने बॉलीवूडमध्ये करिअरला सुरुवात केली.लग्नाच्या ५ वर्षानंतर प्रेरणाने ऑक्टोबर २००५ मध्ये मुलगी ख्यानाला जन्म दिला.यानंतर,जुलै २००९ मध्ये,ती जुळ्या मुलांची वरायन आणि विहानची आई झाली.

प्रेम चोप्राला तीन मुली आहेत.रकीता,पुनीता आणि प्रेरणा.मोठी मुलगी रकिताने पटकथा लेखक आणि प्रसिद्धी डिझायनर राहुल नंदासोबत लग्न केले आहे.त्याचप्रमाणे, मधली मुलगी पुनिताने गायक आणि टीव्ही अभिनेता विकास भल्लासोबत लग्न केले आहे. धकटी मुलगी प्रेरणा हिचे लग्न शर्मन जोशीशी झाले आहे.

प्रेम चोप्राचा जावई शर्मन जोशीने १९९९ मध्ये दिग्दर्शक विनय शुक्ला यांच्या ‘गॉड मदर’ या आर्ट फिल्ममधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.यानंतर तो ‘स्टाइल’ (२००१), ‘एक्सक्यूज मी’ (२००३), ‘शादी नंबर वन’ (२००५), ‘रंग दे बसंती’ (२००६), ‘गोलमाल’ (२००७), ‘3 इडियट्स’ (३ इडियट्स) मध्ये दिसला आणि ‘फेरारी की सवारी’ (२०१२) सारख्या अनेक चित्रपटात काम केले.