Home » ‘या’ कारणामुळे रतन टाटा यांनी आजपर्यंत केले नाही लग्न…
Entertainment

‘या’ कारणामुळे रतन टाटा यांनी आजपर्यंत केले नाही लग्न…

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी आयुष्यभर कोणाशीही लग्न केले नाही.याचा अर्थ असा नाही की त्यांनी कधीही कोणावर प्रेम केले नाही.एका मुलाखतीत स्वतः रतन टाटा यांनी त्यांच्या लव्ह लाईफबद्दल सांगितले होते.त्यांच्या आयुष्यात प्रेमाने एकदा नव्हे तर चार वेळा दार ठोठावले होते, पण कठीण प्रसंगात त्यांच्या नात्याची तार कमकुवत झाली.त्यानंतर त्यांनी पुन्हा कधी लग्नाचा विचार केला नाही. रतन टाटा यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त आपण आज त्यांच्या बद्दल अशी गोष्ट जाणून घेणार आहोत जी तुम्हालाही माहीत नसेल.

दिग्गज उद्योगपती पण प्रेमात अयशस्वी…

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी सुरत येथे झाला.टाटा समूहाच्या माजी अध्यक्षांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आणि एक चांगले स्थान मिळवले.टाटा समूहाला नव्या उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले.रतन टाटा यांनी बिझनेसच्या जगात खूप नाव कमावले पण प्रेमाच्या बाबतीत ते अयशस्वी ठरले.एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अविवाहित उद्योगपती रतन टाटा यांनी त्यांच्या लव्ह लाईफबद्दल अनेक खुलासे केले.

रतन टाटा यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले होते की,ते प्रेमात पडले होते,पण ते त्यांचे प्रेम लग्नाच्या शेवटापर्यंत आणू शकले नाहीत.टाटा म्हणाले की,दुरून पाहिल्यावर त्यांना अविवाहित राहणेच योग्य आहे असे वाटले कारण त्यांनी लग्न केले असते तर परिस्थिती अधिक कठीण झाली असती. ते म्हणाले,’माझ्याकडे कधी हृदय होते का,असे तुम्ही विचाराल तर मी तुम्हाला सांगतो की मी चार वेळा लग्न करण्याबाबत गंभीर झालो आणि प्रत्येक वेळी काही ना काही भीतीने मी मागे हटलो.

टाटा यांनी आपल्या प्रेमाबद्दल सांगितले की,ते अमेरिकेत काम करत असताना एका मुलीच्या प्रेमात पडले होते. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी वातावरण असे होते की लग्न होऊ शकले नाही. 1962 चा तो काळ होता, जेव्हा भारत-चीन युद्ध चालू होते. त्यावेळी रतन टाटा भारतात आले होते पण युद्धामुळे त्यांची मैत्रीण येऊ शकली नाही. अखेर त्याच्या मैत्रिणीने दुसऱ्याशी लग्न केले.रतन टाटा यांचा जन्म एका संपन्न कुटुंबात झाला होता पण त्यांचे जीवन इतके सोपे नव्हते.रतन टाटा ७ वर्षांचे असताना त्यांचे पालक वेगळे झाले.त्यांचे संगोपन त्यांच्या आजीने केले.