Home » या कारणामुळे अभिषेकने स्वतःपेक्षा ३ वर्षांनी मोठ्या असलेल्या ऐश्वर्या सोबत केले लग्न…
Entertainment

या कारणामुळे अभिषेकने स्वतःपेक्षा ३ वर्षांनी मोठ्या असलेल्या ऐश्वर्या सोबत केले लग्न…

अभिनेत्री ऐश्वर्या रायने नुकताच खुलासा केला की तिचा रोका सोहळा अचानक घडला होता.पण त्याआधी तिला ‘रोका’बद्दल माहिती नव्हती. ‘रोका’ म्हणजे काय आणि कसा होतो हे ऍशला माहीत नव्हते. ऐश्वर्या पती अभिषेकपेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे.पण अभिषेकने त्याच्यापेक्षा ३ वर्षांनी मोठ्या असलेल्या ऐशशी लग्न का केले हे तुम्हाला माहीत नसेल.सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अभिषेकने ऐशचे सौंदर्य पाहून तिच्याशी लग्न केले नाही. मग काय कारण होते अभिषेकने ३ वर्षांनी मोठ्या ऐशशी लग्न केले.खुद्द अभिषेकने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की,त्याच्यापेक्षा ३ वर्षांनी मोठ्या असलेल्या ऐशसोबत लग्न करण्याचे कारण तिचे सौंदर्य नसून दुसरे काहीतरी आहे. अभिषेकचे म्हणणे आहे की, त्याने केवळ अॅशसोबत लग्न केले नाही कारण ती बॉलिवूडची सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे किंवा ती मिस वर्ल्ड झाली आहे.त्याऐवजी, अॅशशी लग्न करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ती एक अद्भुत व्यक्ती आहे ति जेवढी सुंदर आहे त्यापेक्षा ती मनाने सुंदर आहे.अभिषेक म्हणतो की,ऐश्वर्या ला घरामध्ये बिना मेकअपचेच राहायला आवडते.अभिषेक आणि ऐश यांनी २००७ मध्ये लग्न केले होते.

अॅशच्या आधी अभिषेकची करिश्मा कपूरसोबत एंगेजमेंट झाली होती.एंगेजमेंटनंतर अभिषेकने तिला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केल्याचे करिश्माने सांगितले होते. अशा स्थितीत ती अभिषेकला नाही म्हणू शकली नाही. अभिषेकसारखा चांगला माणूस आणि बच्चन कुटुंबासारखा चांगला परिवार तिला कधीच मिळू शकत नाही,असेही करिश्माने सांगितले होते.पण लवकरच या दोघांची एंगेजमेंट खेदाने तुटली. करिश्माची मावशी नीतू कपूरला जेव्हा एंगेजमेंट ब्रेकअपबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला.

अभिषेकमुळे एंगेजमेंट तुटली होती

जया बच्चन यांच्यामुळेच दोघांची एंगेजमेंट तुटल्याचे बोलले जात आहे.कारण जया करिश्माला अजिबात पसंत करत नव्हत्या.मात्र अभिषेकमुळेच एंगेजमेंट तुटल्याचे जया यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.बातमीनुसार करिश्माला लग्नानंतर अभिषेकसोबत बच्चन कुटुंबापासून दूर राहायचे होते.पण करिश्माचा हा निर्णय अभिषेकला अजिबात मान्य नव्हता.अशा परिस्थितीत जेव्हा करिश्माने ऐकले नाही तेव्हा अभिषेकला एंगेजमेंट तोडावी लागली.