Home » रेखा व अमिताभ बच्चन यांना एकत्र आणण्यासाठी हेमा मालिनी यांनी या राजकीय नेत्याची घेतली होती मदत,जाणून घ्या…
Entertainment

रेखा व अमिताभ बच्चन यांना एकत्र आणण्यासाठी हेमा मालिनी यांनी या राजकीय नेत्याची घेतली होती मदत,जाणून घ्या…

ड्रीमगर्ल या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री हेमा मालिनी ही आजसुद्धा खूप उत्तम प्रकारे आपला फिटनेस राखून आहे.८० च्या दशकामध्ये आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने हेमामालिनी चाहत्यांप्रमाणे त्या वेळच्या बहुतांश पुरूष कलाकारांनाही वेड लावले होते.हेमामलिनीने १६ ऑक्टोबरला आपला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने हेमा मालिनीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. हेमामालिनी पडद्यावर जितकी आकर्षक दिसते तितकी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आपल्या नातेसंबंधांना व मैत्रीला टिकवण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. हेमा मालिनी आणि रेखा या दोन्ही आघाडीच्या अभिनेत्री एकमेकांच्या अगदी घट्ट मैत्रिणी आहेत व  म्हणूनच अमिताभ आणि रेखा  यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी हेमा मालिनी ने आटोकाट प्रयत्न केले होते हे ऐकून निश्चितच आश्चर्य वाटेल. 

हेमामालिनी आणि रेखा यांची मैत्री ही खूप घट्ट होती. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये या दोघी एकत्र दिसून आल्या आहेत. रेखा प्रमाणे हेमामालिनीचे अमिताभ बच्चन व त्यांची पत्नी अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत मैत्री पूर्ण संबंध आहेत. रेखा  यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळेच हेमामालिनी यांना पुन्हा एकदा या दोघांमध्ये सर्व काही आलबेल व्हावे अशी इच्छा होती व त्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रयत्न केले व एका राजकारणी नेत्याची मदत सुद्धा घेतल्याचे सांगितले जाते.

रेखा आणि  हेमामालिनी या दोघी इतक्या पक्या मैत्रिणी होत्या की त्या दोघी एकमेकींच्या आयुष्यातील सर्व गोष्टी शेअर करत असत. मुकेश अग्रवाल सोबत विवाह केल्यानंतर रेखा पहिल्यांदा हेमामालिनीच्या घरी गेली होती व मुकेश अग्रवाल सोबत संबंधा बद्दल रेखाने हेमामालिनी यांना सर्वप्रथम सांगितले होते‌. हेमा मालिनी यांचा पती अभिनेता धर्मेंद्र यांच्या सोबतही रेखाचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत व या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम सुद्धा केले होते.

अमर सिंह यांना मागीतली होती मदत…

रेखा जी यांच्या आयुष्यावर चरित्र लिहिणारे राहील उस्मान यांनी ‘रेखा : कैसी पहिली जिंदगानी’ या पुस्तकामध्ये अनेक गोष्टींना उजाळा दिला आहे.यामध्ये त्यांनी एक प्रसंग सांगितला आहे की एकदा हेमा मालिनी रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या मध्ये पुन्हा एकदा संवाद सुरू व्हावा यासाठी खूपच चिंतेत होत्या व यासाठी त्यांनी दिवंगत अमर सिंह यांना विनंती केली होती की तुम्ही अमिताभ बच्चन यांना भाऊ मानता तर रेखासाठी तुम्ही त्यांच्याशी बोलत का नाही