Home » कार्तिक आर्यनच्या ‘भुल भुलैय्या २’ ने KGF आणि RRR या चित्रपटांनाही टाकलं मागे सहा दिवसातचं केली इतक्या कोटींची कमाई…!
Entertainment

कार्तिक आर्यनच्या ‘भुल भुलैय्या २’ ने KGF आणि RRR या चित्रपटांनाही टाकलं मागे सहा दिवसातचं केली इतक्या कोटींची कमाई…!

गेल्या काही दिवसांपासून टॉलीवूड आणि बॉलीवूड यांच्यामध्ये एक प्रकारचे सोशल मीडियावरील युद्ध रंगले आहे याला कारण म्हणजे सध्या टॉलिवूडमधील पुष्पा, आर आर आर, के जीएफ चाप्टर टू हे चित्रपट व मागील काळामध्ये आलेले काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते व या चित्रपटांनी कोटींची कमाई केली होती. याउलट बॉलीवूडला उतरती कळा लागल्याचे चित्र दिसत होते.

बॉलिवूडमधील सुपर स्टार्सना घेऊन निर्माण केलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाही.या  वातावरणात कार्तिक आर्यन व कियारा अडवाणी यांनी अभिनय केलेल्या भूलभुलैया 2 या चित्रपटाने आशादायी चित्र निर्माण केले आहे.अनेकदा  बॉलीवूड मध्ये टॉलीवूडमधील चित्रपट रिमेक केले जातात व  बॉलीवूडमधील चित्रपटांची सिक्वलही बनवले जातात. हे सिक्वल बहुतांश वेळा फ्लॉप ठरतात मात्र याला अपवाद ठरला आहे भूलभुलैया 2.

अक्षय कुमारने अभिनय केलेला  भूल भुलैया हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगलाच स्मरणात आहे यामुळेच या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. व या अपेक्षा कार्तिक आर्यन व कियारा अडवाणी यांनी पूर्ण केल्याचे दिसून येते. समिक्षकांनी या चित्रपटाला परफेक्ट म्हटले नाही मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कामगिरी केली आले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १४.११ कोटी इतके बॉक्स ऑफिस कलेक्शन केले व सहा दिवसांमध्ये या चित्रपटाने ८४ कोटी इतके बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

या चित्रपटाचे बजेट सत्तर ते ऐंशी कोटी रुपये इतके आहे. म्हणजेच हा चित्रपट पैसा वसूल चित्रपट ठरला आहे. भुलभूलैया या चित्रपटा बरोबर कंगना राणावतचा धाकड हा बहुचर्चित  चित्रपट प्रदर्शित झाला होता मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.