Home » ‘या’ क्रिकेटपटूंचे होते बॉलिवूड अभिनेत्री सोबत अ फे अर…
Celebrities Entertainment News Sports

‘या’ क्रिकेटपटूंचे होते बॉलिवूड अभिनेत्री सोबत अ फे अर…

बॉलीवूड आणि क्रिकेट हे दोन्ही क्षेत्र एकमेकांपासून वेगळे केले जाऊ शकत नाहीत कारण भारतामध्ये या दोन्ही क्षेत्रात सर्वाधिक ग्लॅमर ,पैसा आणि प्रसिद्धी मिळते.त्यामुळे जेव्हा या दोन ग्लॅमरस क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येतात तेव्हा निश्चितच भुवया उंचावल्या जातात.क्रिकेटर्स आणि बॉलीवूड मधील सेलिब्रिटी या दोघांनाही खूप मोठे चाहते लाभलेले असतात व त्यांचे चाहते कधी कधी त्यांच्या प्रेमापोटी केवळ त्यांची एक झलक पाहण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोविंग असलेल्या ह्या दोन क्षेत्रांमधील व्यक्ती एकमेकांसोबत दिसू लागतात तेव्हा प्रसारमाध्यमांमध्ये निश्चितच चर्चाही खमंग व्हायला लागतात.

बॉलीवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्स एकमेकांना निरनिराळे पुरस्कार समारंभ ,जाहिरातींचे शूटिंग किंवा प्रमोशनल कार्यक्रम यामध्ये नेहमीच भेटत असतात व यामधूनच काही बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंच्या अफेअरच्या चर्चा रंगायला लागतात. अगदी फार पूर्वीपासून काही क्रिकेटर्सनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत विवाह केले आहेत व ते सुखासमाधानाने संसार सुद्धा करत आहेत. मात्र यापैकी काही प्रेमप्रकरण काही काळानंतर संपुष्टात आली. आज आपण असेच काही क्रिकेटपटू विषयी जाणून घेणार आहोत ज्यांचे बॉलिवूड अभिनेत्रींसोबत असलेले प्रेमसंबंध खूप जास्त प्रमाणात चर्चिले गेले.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा: भारतीय क्रिकेट जगातील सध्याचा दमदार खेळाडू म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली आणि बॉलिवूड मधील अष्टपैलू व आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची लव स्टोरी म्हणजे क्रिकेट जगत आणि बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक आणि आदर्श अशी लव्ह स्टोरी मानली जाते. हे दोघे सर्वात प्रथम एका जाहिरातीच्या सेटवर एकमेकांना भेटले व हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या दोघांनी कधीही आपल्या प्रेम संबंधांना नकार दिला नाही‌.अनेक सार्वजनिक ठिकाणी ते अगदी खुलेआमपणे प्रसारमाध्यमांची पर्वा न करता एकत्र वावरत होते. या दोघांच्याही क्षेत्रांमधील चढ उतारांचा परिणाम त्यांच्या नातेसंबंधांवर त्यांनी कधीही होऊ दिला नाही.एक काळ असा होता जेव्हा विराट आणि अनुष्का एकमेकांसोबत ब्रेकअप करण्याच्या निर्णयापर्यंत ही पोहोचले होते मात्र या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इटलीमध्ये त्यांनी एकमेकांसोबत विवाहाची गाठ बांधली. यानंतर हे दोघेही एकमेकांना आपापल्या करिअरमध्ये योग्य ती स्पेस आणि प्रोत्साहन देताना नेहमीच दिसून येतात .सध्या अनुष्का शर्मा गरोदर असून येत्या काळामध्ये हे दोघे पालक म्हणून भूमिका स्वीकारतील.

झहीर खान आणि सागरिका घाटगे: चक दे इंडिया या आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटांमधून खूपच यशस्वी आगमन केलेल्या सागरिका घाटगे हिची भारतीय क्रिकेट संघातील जलदगती गोलंदाज झहीर खान सोबत एका कॉमन फ्रेंड मार्फत ओळख झाली व त्यानंतर या ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. या दोघांनीही आपले नाते प्रसारमाध्यमांसमोर येऊ दिले नाही. मात्र युवराज सिंग यांच्या विवाहाच्या वेळी सर्वात प्रथम झहीर आणि सागरिका सार्वजनिक रित्या एकत्र दिसले आणि इथूनच यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. या दोघांनीही आपल्या कुटुंबियांच्या संमतीने 2017 साली कोर्ट मॅरेज केले व कोर्ट मॅरेज नंतर काही अन्य विधी सुद्धा त्यांनी सर्वांच्या साक्षीने पार पाडले. हे दोघे सुद्धा सध्या आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये खूप सुखी असून सागरिका सुद्धा सध्या गर्भवती आहे असे प्रसारमाध्यमांमध्ये त्यांनी अधिकृतरीत्या जाहीर केले आहे.

युवराज सिंग आणि हेजल किच: युवराज सिंग हा भारतीय क्रिकेट संघातील अगदी खंदा असा खेळाडू असून त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाते. युवराज सिंग चे वडील सुद्धा भारतीय क्रिकेट संघामधील खेळाडू होते. हेजल कीच ही अभिनेत्री आपल्या अप्रतिम सौंदर्याने आ अंते अमलापुरम या गाण्यांमधून अनेक हृदयांना घायाळ करणारी अभिनेत्री मानली जाते. हेजल कीच ने  हरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर या चित्रपटांमध्येही भूमिका केली आहे. हेजलने हिंदीमधील काही मोजक्या चित्रपटांमध्ये अभिनय केला असून एका मित्राद्वारे हेजल आणि युवराजची ची ओळख झाली‌.मात्र सुरुवातीला हेजलने युवराजच्या फ्लर्टिंगमध्ये फारसा रस दाखवला नाही व व काही काळानंतर हळूहळू तिलाही युवराज चे प्रेम खरे आहे हा विश्वास निर्माण झाल्यानंतर त्यांनी गोवा येथे विवाह केला.या विवाहास बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

युवराज सिंग आणि किम शर्मा: बॉलीवूड मधील अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंचे सर्वात जास्त चर्चिले गेलेले अफेअर म्हणजे युवराज सिंग आणि किम शर्मा होय. मात्र एकमेकांच्या वैचारिक मतभेदांमुळे काळाच्या ओघात या दोघांनी ब्रेक-अप केले. मोहब्बते या चित्रपटा द्वारे चर्चेत आलेली अभिनेत्री किम शर्मा ही त्यानंतर फारशी चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय नव्हती ‌.मात्र युवराज सिंग सोबतच्या अफेअर मुळे ती पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली. या दोघांचे ब्रेक-अप झाल्यानंतर किमने अली पंजाबी या केनिया स्थिती उद्योजका सोबत विवाह केला मात्र हा विवाह सुद्धा फार काळ टिकू शकला नाही. युवराज आत आपल्या वैवाहिक आयुष्य मध्ये स्थिर झाला आहे.

युवराज सिंग आणि दीपिका पदुकोण: युवराज सिंग आणि दीपिका पदुकोण यांचेही काही काळ अफेअर होते असे सांगितले जाते‌ युवराज सिंग आणि दीपिका पदुकोण अनेक ठिकाणी एकत्र असतानाची छायाचित्रे व्हायरल झाली होती. मात्र रणबीर कपूर सोबत रिलेशनशिप सुरू झाल्यानंतर दिपीकाने युवराज सिंगला डच्चू दिला असेही बोलले जाते. मात्र रणबीर कपूर सोबतचे दीपिकाचे प्रेम संबंध हे फार काळ टिकू शकले नाही व शेवटी रणवीर सिंग च्या रूपात तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळाला.

गीता बसरा आणि हरभजन सिंग: गीता बसरा ही सुंदर आणि आकर्षक चेहऱ्याच्या अभिनेत्रीने हरभजनसिंग सोबत विवाह करण्याअगोदर एकमेकांना बरीच वर्ष डेट केले होते.गीता बसराला पाहिल्याबरोबर हरभजनसिंग तिच्या प्रेमात वेडा झाला होता. या दोघांनी 2015 साली विवाह केला. सध्या हे दोघेही आपल्या मुलीसोबत अतिशय समाधानी आहेत.