Home » अक्षय कुमारचा मुलगा आरव पडला ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात…
Celebrities

अक्षय कुमारचा मुलगा आरव पडला ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात…

बॉलीवूड मध्ये अभिनेता अक्षय कुमार ला खिलाडी कुमार म्हणून ओळखले जाते.अक्षय कुमार हा सध्या बॉलिवूडमध्ये सर्वात यशस्वी अभिनेता आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.अक्षय कुमार वर्षभरात जवळपास 4 ते 5 चित्रपट करतो व सर्व चित्रपट सुपरहिट ठरतात.अक्षय हा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ही आहे.अक्षयने प्रचंड संघर्ष करून बॉलिवूड मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.आज अक्षय कुमारकडे  चैनीच्या सगळ्या गोष्टी आहेत.

अक्षय कुमार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो.आज-काल अक्षय कुमारचा मुलगा आरव चर्चेत आहे.अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत अक्षयने लग्न केले आहे व या दोघांना आरव हा मुलगा आहे.आरव हा नेहमीच लाईट पासून दूर असतो.सध्या त्याला आवडत असलेल्या अभिनेत्री मुळे तो चर्चेत आला आहे.आरवला ही अभिनेत्री खूपच आवडते व तो या अभिनेत्री चा खूप मोठा फॅन आहे.ही अभिनेत्री म्हणजे आलिया भट.आरवला अभिनेत्री आलिया भट सोबत लग्न करण्याची इच्छा आहे.तिच्यासोबत त्याला डेट वरही  जायचे आहे.आलियाला  भेटण्याची एकही  संधी आरव सोडत नाही.

आरव अजून बॉलीवूड मध्ये आलेला नसून यापुढे सुद्धा येण्याचे त्याचे प्रयोजन नाही.आलिया भट ही आघाडीची अभिनेत्री असून ती सध्या रणबीर कपूर लाल डेट करत आहे व हे दोघे पुढील काही महिन्यांमध्ये विवाहबद्ध होणार आहेत असे निकटवर्तीय सांगतात.