Home » अबब! संजय दत्त चे होते अंबानी कुटुंबाच्या ‘या’ सुनेसोबत प्रेमसंबंध…!
Celebrities

अबब! संजय दत्त चे होते अंबानी कुटुंबाच्या ‘या’ सुनेसोबत प्रेमसंबंध…!

ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा एकुलता एक आणि लाडावलेला मुलगा म्हणून संजय दत्त प्रसिद्ध आहे.संजय दत्तने आपल्या आई-वडिलां प्रमाणेच अभिनय क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय घेतला व त्याला मिळालेल्या इतक्या समृद्ध फिल्मी वारश्याचा उपयोगही त्याला पुरेपूर झाला.नरगीस आणि सुनिल दत्त यांनी आपल्या मुलाला बॉलिवूडमध्ये एंट्री घेण्याचा मार्ग सहज आणि सोपा व्हावा यासाठी अनेक परिश्रम घेतले.

संजय दत्त चा पहिला चित्रपट रॉकी हा होता.या चित्रपटामध्ये संजयने बॉलिवूड मध्ये आपले नाणे खणखणीत वाजवण्यासाठी हर एक प्रकारचे प्रयत्न करावेत आणि या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये कोणतीही कसूर राहू नये यासाठी स्वतः सुनील दत्त संजयच्या कामाकडे जातीने लक्ष घालत होते.या चित्रपटामध्ये संजय ची नायिका होती टीना मुनीम होय.टीना आणि संजय हे महाविद्यालयीन जीवनापासून एकमेकांचे खूप चांगले मित्र होते.

संजय ला टीना खूप आवडत असे व टिनाचेही संजय वरती तितकेच प्रेम होते.या चित्रपटासाठी टिनाने देव आनंद यांच्या चित्रपटाची ऑफर सुद्धा नाकारली होती.आपल्या करियरला टीनाने रॉकी या चित्रपटासाठी अक्षरशः पणाला लावले होते ते केवळ संजय वरील प्रेमापोटी.संजय दत्त आणि टीना मुनीम एकमेकांच्या प्रेमामध्ये इतके आकंठ बुडाले होते की रॉकी चित्रपटानंतर ते एकमेकांशी लग्न करण्याबाबत गांभीर्याने विचार करत होते.

मात्र संजयच्या करियरच्या सुरुवातीलाच त्याने लग्न करून करिअर संपुष्टात आणू नये असे नर्गिस यांना वाटत होते.म् तून संजय आणि टीना यांना एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.वडील सुनील दत्त स्वतः सेटवर हजर राहून टीना आणि संजय यांचे नाते जास्त जवळ येऊ नये यासाठी लक्ष ठेवत असत मात्र तरीही त्यांना गुंगारा देऊन हे दोघे एकमेकांना भेटत. आपल्या करियरला संजय साठी पणाला लावणारी टीना संजयच्या व्यसनाधीनतेमुळे वैतागली होती.

अमलीपदार्थांच्या विळख्यात असणाऱ्या संजय ला सुधारण्यासाठी सुद्धा टीनाने प्रयत्न केले मात्र यामध्ये ती यशस्वी झाली नाही. संजय अमली पदार्थांच्या वेळेच्या मध्ये अधिकाधिक फसत चालला होता व त्यांनी टीनाच्या बाबतीत हे खूप जास्त अतिरेकी प्रेम दाखवण्यास सुरुवात केली होती‌.त्यामुळे शेवटी वैतागून टीना अमेरिकेला निघून गेली व इकडे संजय व्यसनाच्या गर्तेत अधिक खोल जाऊ लागला.टिनाने नंतर मुकेश अंबानी यांचे लहान भाऊ व प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासोबत विवाह केला.