Home » अमीर सोबत आयुष्यात कधीही लग्न करणार नाही,फातिमा सना शेखने सांगितले हे कारण…
Celebrities

अमीर सोबत आयुष्यात कधीही लग्न करणार नाही,फातिमा सना शेखने सांगितले हे कारण…

आमिर खान हा अभिनेता बॉलीवुड मध्ये  मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आमिर खान हा वर्षभरामध्ये तीन ते चार सिनेमे न करता एकच चित्रपट तीन ते चार वर्ष लावून  करतो व या चित्रपटासाठी तो शंभर टक्के मेहनत घेतो. आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय देतो म्हणूनच आमिर खान चे चित्रपट सुपरहिट व वेगळ्या धाटणीचे असतात. आमिर खान नेहमीच त्याच्या अभिनयामुळे व सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतो.मात्र सध्या आमीर पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आला आहे हे पत्नी किरण रावमुळे.आमिर खान ने नुकतेच आपल्या पत्नीसोबत म्हणजेच किरण राव सोबत घटस्फोट घेतला आहे व तो पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विवाहबद्ध होणार आहे अशा बातम्या येत आहेत.

किरण सोबत विभक्त झाल्यानंतर आमिर खान एका अभिनेत्रीला डेट करत आहे अशा चर्चा रंगत होत्या.ही अभिनेत्री म्हणजे दंगल या चित्रपटामध्ये आमिरच्या मुलीची भूमिका केलेली फातिमा सना शेख होय.फातिमा सना शेख व आमीर खान हे रिलेशनशिपमध्ये असून लवकरच विवाहबद्ध होणार आहे अशी चर्चा रंगली होती.मात्र फातिमा सना शेखने स्वतः असे सांगितले आहे की ती अमीरसोबत आयुष्यभर कधीही लग्न करणार नाही.फातिमा सना शेखचे 29 वर्षे असून ती आमीरच्या मुलीच्या वयाची आहे.

तिने बाल कलाकार म्हणून सुद्धा काम केलेले आहे व सध्या तिचे  आमिर सोबत एका मुलाखतीमध्ये आपल्या लग्न बद्दल अनेक खुलासे केले आहेत.तिने असे म्हटले आहे की तिला लग्न करण्याची खूप भीती वाटते कारण एखाद्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता तेव्हा हे जरुरी नसते की तुम्ही त्या व्यक्तीसोबत विवाह केलाच पाहिजे व लग्न केल्यानंतर जोडीदारासोबत खुप लवकर दुरावा निर्माण होतो अशी तिची भावना आहे.तिच्या या विधानानंतर ती भविष्यात आमीर सोबत लग्न करणार नाही असा कयास सर्वांनी बांधला आहे.