Home » कंगना राणावतमुळे राखी सावंतला जब्बर धक्का थेट रुग्णालयात दाखल,रडत-रडत म्हणाली तिला नरकातही जागा मिळणार नाही…
Celebrities

कंगना राणावतमुळे राखी सावंतला जब्बर धक्का थेट रुग्णालयात दाखल,रडत-रडत म्हणाली तिला नरकातही जागा मिळणार नाही…

बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हटली जाणारी अभिनेत्री राखी सावंत प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत मांडते.यावेळीही तीने सर्वात चर्चेत असलेला वाद निवडला आहे,तो म्हणजे कंगना राणौतचे भीक मागणारे विधान.सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत राखीने हॉस्पिटलमधून कंगनाला फटकारले आहे.ती कंगनाला शिव्या देत आहे.

राखी रुग्णालयात दाखल…

राखी सावंतने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. कंगनाच्या या वक्तव्यावर देशात खळबळ उडाली असताना ड्रामा क्वीनचा हा व्हिडिओ समोर आला आहे. राखीने सांगितले की, कंगनाच्या भीक मागण्याच्या वक्तव्यामुळे ती इतकी दुखावली गेली आहे की तिला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. तीला किती धक्का बसला आहे, हे त्याच्या आवाजावरून कळते.

राखी सावंतचे वाढला बीपी …

शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये राखी हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली दिसत आहे. एक परिचारिका तीचा रक्तदाब तपासत आहे. व्हिडिओमध्ये राखी सांगत आहे की, यावेळी तिचे बीपी खूप वाढले आहे. राखीने सांगितले की, ती आजारी पडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले या कंगना राणौतच्या विधानाने तिला धक्का बसला.

कंगनाच्या वक्तव्यावरुन गदारोळ

कंगनाच्या एका वक्तव्यावरून देशात खळबळ उडाली आहे. त्यांच्याकडून पद्मश्री परत घेण्याबाबत कोणी बोलत असेल, तर कोणी राष्ट्रपतींकडे तिला अटक करण्याची मागणीही केली आहे. त्याचे झाले असे की, नुकतेच एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात कंगनाने १९४७ मध्ये स्वातंत्र्य नाही तर भीक मागितल्याचे सांगितले होते.

राखीने कंगनाला शिव्या दिल्या 

कंगनाने पुढे सांगितले की, प्रत्यक्षात स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले होते, जेव्हा नरेंद्र मोदींचे सरकार आले होते. त्यानंतर त्यांना अनेकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. कंगनाच्या या वक्तव्यावर राखी सावंतने नाराजी व्यक्त करत ‘तुला भीक मागून पद्मश्री पुरस्कार मिळाला’ असं म्हटलं आहे. राखी म्हणते की कंगना तिच्या मातीचा आदर करत नाही आणि त्यामुळे तिला नरकात ही स्थान मिळणार नाही.

About the author

Being Maharashtrian