Home » दाक्षिणात्य अभिनेत्यांपैकी ‘हा’ अभिनेता घेतो सर्वाधिक मानधन, आकडा एकूण व्हाल चकित…!
Celebrities

दाक्षिणात्य अभिनेत्यांपैकी ‘हा’ अभिनेता घेतो सर्वाधिक मानधन, आकडा एकूण व्हाल चकित…!

चित्रपट व्यवसाय हा प्रचंड आर्थिक उलाढाली असणारा व्यवसाय मानला जातो.बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांचा जणूकाही एक क्लबच निर्माण झाला आहे.या क्लबमध्ये 100 कोटींपेक्षा जास्त मानधन एका चित्रपटासाठी घेणाऱ्या बॉलीवूड मधील सुपरस्टार चा समावेश होतो.सध्याच्या घडीला सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्यांमध्ये सलमान खान, शाहरुख खान,अजय देवगण,आमिर खान,अक्षय कुमार यांसारख्या अभिनेत्यांचा उल्लेख केला जातो.

सर्वाधिक मानधन घेण्याची जणू काही स्पर्धा बॉलीवूड मधील अभिनेत्यांमध्ये लागलेली दिसून येते.सध्या केवळ अभिनयच नव्हे तर अन्यही अनेक मार्गाने बॉलीवूड मधील अभिनेते आर्थिक उत्पन्न निर्माण करतात.निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रांमध्ये अनेक कलाकार सध्या रस घेत आहेत यामुळे केवळ अभिनय नव्हे तर चित्रपटाच्या एकूण आर्थिक नफ्यामध्येही ही त्यांना काही भाग निश्चितपणे मिळत असतात व यासंबंधीचे करार चित्रीकरणाला सुरूवात करण्याअगोदरच तयार केले जातात.

भारतामध्ये बॉलीवुड प्रमाणे प्रादेशिक भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात चित्रपट निर्मिती केली जाते.प्रादेशिक भाषांमध्ये दक्षिण भारतीय चित्रपट हे बिग बजेट व प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देणारे असतात.भारतात  दक्षिण भारतीय अभिनेत्यांची अक्षरशः मंदिरे बांधली जातात इतके प्रेम चाहत्यांकडून त्यांना मिळते.त्यांची लोकप्रियता व संपत्ती बॉलिवुडच्या अभिनेत्यांना टक्कर देणारी आहे.अन्य प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांच्या तुलनेत दक्षिण भारतीय अभिनेत्यांचे मानधन हे बॉलिवूडमधील अभिनेत्यांना टक्कर देणारे असते.

दक्षिण भारतामध्ये काही अभिनेते सुपरस्टार ठरलेले आहे व संपूर्ण जगामध्ये त्यांचा चाहता वर्ग पसरलेला आहे.त्यांचे चित्रपट पहिल्या दिवशी पहिल्या शोला पाहण्यासाठी तुफान गर्दी उसळते.रजनीकांत हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. रजनीकांत यांचे भारतीय चित्रपट सृष्टी मध्येच नव्हे तर संपूर्ण भारतभर अनेक चाहते आहेत व त्यांना अभिनयाचे दैवत मानले जाते. रजनीकांत हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

रजनीकांत यांच्यापाठोपाठ विजय हा दक्षिण भारतातील 100 कोटी  मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.त्यांच्या नुकत्याच आलेल्या थलपती या चित्रपटासाठी त्यांनी शंभर कोटी रुपये इतके मानधन घेतले आहे त्यामुळे दक्षिण भारतातील महागडा अभिनेता म्हणून विजय यांना ओळखले जाते.विजय यांचे चित्रपट सुद्धा अव्वल दर्जाचे असतात.बाहुबली चित्रपटाची लोकप्रियता आणि भव्यदिव्यता ही सर्वज्ञात आहे.बाहुबली अर्थात प्रभास हासुद्धा तेलगू चित्रपटांमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे.दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये रामचरण,नागार्जुन,महेश बाबू,अल्लू अर्जुन,याअभिनेत्यांचा सामावेश आहे