Home » ‘पुष्पा’ चित्रपटातील ही खलनायिका वास्तविक जीवनात दिसते खुपच सुंदर…
Celebrities

‘पुष्पा’ चित्रपटातील ही खलनायिका वास्तविक जीवनात दिसते खुपच सुंदर…

अल्लू अर्जुन ने अभिनय केलेल्या पुष्पा द राईज या चित्रपटाची लोकप्रियता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दीड महिन्यांनंर ही कायम असल्याचे दिसून येत आहे.या चित्रपटातील संवाद आज सुद्धा प्रेक्षक अगदी तोंडपाठ करत आहेत.अल्लू अर्जुन या चित्रपटांमधील अगदी शेर दिल असा हिरो दाखवला असला तरीही त्याच्याविरोधात खलनायकांची अक्षरशः फौज उभारण्यात आली आहे.यामध्ये शिनु,जॉली रेड्डी,भवर सिंग शेखावत यांच्याप्रमाणेच दाक्षायणी या खलनायिकेनेसुद्धा सर्वांच्या हृदयात धडकी भरवली आहे.

दाक्षायणी ही शिशु या खलनायकाची पत्नी दाखवण्यात आली आहे. या खलनायकाच्या पत्नीने आपल्या भूमिकेत असे काही रंग भरले आहेत की समोरचा पार गर्भगळीत होऊन जातो.प्रत्यक्षात ही भूमिका साकारली आहे अनुसया भारद्वाज या दाक्षिणात्य अभिनेत्रीने.अनुसया भारद्वाज ही पुष्पा द राईज या चित्रपटामध्ये जितकी खल प्रवृत्तीची दाखवली आहे अगदी त्याच्या उलट वैयक्तिक आयुष्य मध्ये आहे.अनुसया ही वैयक्तिक आयुष्य मध्ये खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहे.

चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेल्या खलनायकांच्या पात्रांमध्ये दाक्षायणी हे पात्र सर्वात क्रूर असे मानले जाते. या चित्रपटातील दाक्षायणी ची भूमिका असलेले दोन प्रसंग चांगलेच लक्षात राहतात. एका प्रसंगांमध्ये जेव्हा दाक्षायणी समोर तिचा भाऊ एका व्यक्तीचा खून करत असतो तेव्हा जणू काही घडतच नसल्याच्या अविर्भावात दाक्षायणी पान चघळत असते व दुसऱ्या प्रसंगांमध्ये जेव्हा पुष्पा तिच्या भावाचा खून करतो त्यावेळी ती आपल्या पतीवर भावाच्या खुनाचा बदला घेत नाही म्हणून नाराज असते व त्याच्या छातीवर बसून ब्लेडने त्याचा गळा चिरते.

आतापर्यंतच्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये एखाद्या अभिनेत्रीने खलनायकाची अशी भूमिका साकारल्याचे स्मरणात नाही.चित्रपटातील अन्य नायक व खलनायकांच्या गर्दीमध्ये दाक्षायणी हे पात्र जिवंत करण्याची कला अनुसया ने खूप उत्कृष्टपणे साकारली आहे.चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे व या सिक्वलमध्ये दाक्षायणी आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी काय करते हे बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नक्कीच आहे. या चित्रपटांमध्ये तिने ज्या ताकदीने आपले पात्र उभे केले आहेत ते बघता ती या चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुन ला तोडीसतोड असल्याचेही चहात्यांचे मत आहे. गेली 19 वर्षे अनुसया अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.

केवळ चित्रपटांमध्ये नव्हे तर एक होस्ट आणि अँकर म्हणून सुद्धा तिने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या अगोदर अनुसया ला दोन वेळा फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.अनुसया चा जन्मा आंध्रप्रदेश मध्ये 1985 साली झाला.सध्या ती 36 वर्षांची आहे.सर्वात प्रथम अनुसया ला 2003 मध्ये एका म्युझिक व्हिडिओमध्ये पाहण्यात आले यानंतर तिला 2016साली तिचा पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे नाव क्षणम असे होते. 2008 साली अनुसया ने आपले एमबीएचे शिक्षण पूर्ण केले व यानंतर ती एच आर एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीही करत होती. आपल्या नोकरीमुळे तिने सुरुवातीच्या काळात काही चित्रपटांच्या ऑफर्सही नाकारल्या.

यानंतर तिने साक्षी या वाहिनीवरील एका शोचे होस्ट म्हणून काम केले. या शोने तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली व याचीच परिणिती म्हणून तिला अल्लू अर्जुन सोबत पहिला चित्रपट मिळण्यामध्ये झाले. पुष्पा हा अनुसया चा अभिनय केलेला तेरावा चित्रपट आहे.पुष्पा या चित्रपटाने अनुसया ला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.यानंतर रामचरण सोबत व चिरंजीवी सोबत अनुसया आचार्य चित्रपटामध्ये दिसणार आहे.याव्यतिरिक्त तिच्याकडे अन्यही बिग बजेट चित्रपट आहेत.

अनुसया ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती डबिंग आर्टिस्ट म्हणून सुद्धा काम करते.सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत व तिच्या छायाचित्रांना चहाते खूप पसंत करतात.अनुसया ही प्रत्यक्ष आयुष्यामध्ये खूपच आकर्षक आणि बोल्ड आहे हे तिच्या छायाचित्रांमधून वेळोवेळी दिसून आले आहे.अनुसया ही विवाहित असून दोन मुलांची आई सुद्धा आहे.