Home » ‘पुष्पा’ रिअल लाईफ मध्ये पहिल्याच भेटीत झाला होता ‘या’ मूलीवर फिदा…
Celebrities

‘पुष्पा’ रिअल लाईफ मध्ये पहिल्याच भेटीत झाला होता ‘या’ मूलीवर फिदा…

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा द राईज या चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले आहे.या चित्रपटातील पुष्पा हे पात्र साकारणारा अभिनेता अल्लू अर्जुन हा संपूर्ण जगभरातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक बनला आहे.अल्लू अर्जुनने याअगोदर सुद्धा सुपर हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.अल्लू अर्जुन हा अनेक तरुणींच्या हृदयावर राज्य करतो मात्र त्याने स्वतःचे हृदय पत्नी स्नेहा हिला पहिल्याच भेटीत देऊन टाकले होते.

अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांची लव्ह स्टोरी ही एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही.अल्लू अर्जुन ला स्नेहा पहिल्याच भेटीत आवडली होती.अल्लू आणि स्नेहा यांची भेट अमेरिकेत एका मित्राच्या लग्नामध्ये झाली होती.या लग्नामध्ये अल्लू अर्जुन ने स्नेहा ला पाहताक्षणीच पसंत केले होते.स्नेहाला अल्लू अर्जुन हा अभिनेता असल्याची माहिती होते मात्र तिने त्या वेळी त्याचा कोणताही चित्रपट पाहिलेला नव्हता.

अल्लू अर्जुन ने स्नेहा कडे पाहिल्यावर एक स्मितहास्य केले व स्नेहाने सुद्धा त्याला छानशी स्माइल दिली व तिथूनच या दोघांचे मैत्रीला सुरुवात झाली या दोघांच्या मैत्रीचे परावर्तन हे प्रेम संबंधांमध्ये झाले व काही काळ डेट केल्यानंतर या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.अल्लू अर्जुन यांनी आपल्या वडिलांना स्नेहा च्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी पाठवले.मात्र स्नेहा चे वडील या प्रस्तावासाठी राजी नव्हते व त्यांनी या विवाहाला स्पष्ट नकार दिला.

स्नेहा ही हैदराबाद मधील एका प्रसिद्ध व्यावसायिकाची मुलगी आहे.हे दोघे सुदधा एकमेकांशी लग्न करण्याचा संदर्भात खूपच ठाम होते व म्हणूनच त्यांनी घरच्यांच्या अनेक मिनतवाऱ्या करून व त्यांना आश्वासन देऊन या लग्नासाठी राजी केले.6 मार्च 2011 रोजी अखेरीस स्नेहा आणि अल्लू अर्जुन विवाहबंधनात अडकले.स्नेहा आणि अल्लू अर्जुन चित्रपट सृष्टीतील आदर्श जोड्यांपैकी एक मानले जातात. या दोघांना अयान आणि अ-हा ही दोन मुले सुद्धा आहेत.अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांच्यामधील परस्पर सामंजस्य हे वेळोवेळी दिसून येते.

स्नेहा चित्रपटसृष्टीशी संबंधित नसली तरीही तिला अल्लू अर्जुन च्या कामातील बारकाव्यांचा निश्चितच अंदाज आहे व ती नेहमीच त्याला सहकार्य करते. अल्लू अर्जुन हा एक कमालीचा अभिनेता आहे मात्र तो पक्का फॅमिली मॅन आहे असेसुद्धा म्हटले जाते.अल्लू अर्जुन चे वडील सुद्धा चित्रपट दिग्दर्शक आहेत.अल्लू अर्जुन हा प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी यांचा पुतण्या आहे.गंगोत्री या चित्रपटाद्वारे अल्लू अर्जुन ने 2003 साली चित्रपट क्षेत्रामध्ये प्रवेश केला.

या नंतर अनेक सुपरहिट चित्रपट अल्लू अर्जुन ने दिले. सध्याच्या घडीला अल्लू अर्जुन हा सर्वाधिक मानधन मिळणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक असून त्याचा बंगला हा शंभर करोडचा  आहे.अल्लू अर्जुनला अलिशान गाड्यांचा खूप छंद आहे व त्याच्याकडे ऑडी,बीएमडब्ल्यू ,मर्सिडीज या जगभरातील आलिशान गाड्यांचा संग्रह आहे.