Home » प्रभुदेवाने बांधली दुस-यांदा लग्नाची गाठ
Celebrities

प्रभुदेवाने बांधली दुस-यांदा लग्नाची गाठ

हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये नृत्याचा एक वेगळाच प्रवाह सुरू करणाऱ्या प्रभू देवा यांना नृत्याचे गुरूच मानले जाते .प्रभुदेवा हे मूळचे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीशी निगडित आहेत. प्रभू देवा हे आपल्या नृत्य आणि चित्रपटांप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे सुद्धा कायम चर्चेत असतात. नुकतेच प्रभुदेवा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांनी केलेल्या दुसऱ्या विवाहामुळे. प्रभुदेवा यांनी नुकतेच मुंबई स्थित एका फिजिओथेरपीस्ट सोबत विवाह केला आहे .

त्या अगोदर त्यांचे नाव त्यांच्या स्वतःच्या भाची सोबत जोडले जात होते. अशा अफवा पसरविल्या जात होत्या की प्रभुदेवा यांचे त्यांच्या भाचीसोबतच अफेअर असून ते लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. प्रभुदेवा यांनी या सर्व अफवांना खोटे ठरवत मुंबईस्थित फिजिओथेरपीस्ट सोबत लग्न करून सध्या ते दोघे चेन्नई येथे राहत आहेत. प्रभुदेवा यांचा पहिला विवाह लता यांच्यासोबत 1995 साली झाला होता.  रामलता आणि प्रभुदेवा यांचे वैवाहिक आयुष्य सुखासमाधानाने चालू होते.

त्यांना तीन मुले सुद्धा होती. यापैकी मोठ्या मुलाचे 2008 साली कॅन्सरमुळे दुःखद निधन झाले. प्रभुदेवा यांचे नाव दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार नयनतारा हिच्यासोबत जोडले जात होते. नयनतारा आणि प्रभुदेवा यांच्या वाढत्या जवळीकीमुळे लता आणि प्रभुदेवा यांच्यामध्ये खटके उडू लागले व या वादविवादाचे पर्यावसान हे 2011साली प्रभुदेवा आणि लता यांच्या विभक्त होण्यामध्ये झाले .त्यानंतर प्रभू देवा बरीच वर्षे एकटेच राहत होते. काही उपचाराच्या निमित्ताने एका कॉमन फ्रेंडच्या रुपात त्यांची आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत भेट झाली. प्रभुदेवा सध्या कामांमध्येही खूप व्यस्त आहेत.ते राधे या चित्रपटाच्या निर्देशनामध्ये व्यस्त आहेत.

About the author

beingmarathi