Home » ‘फॉरेनची पाटलीन’ या चित्रपटात मुख्य भूमिका निभावणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे दुःखद निधन…
Celebrities

‘फॉरेनची पाटलीन’ या चित्रपटात मुख्य भूमिका निभावणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे दुःखद निधन…

मराठी चित्रपट सृष्टीतील चित्रपट, मालिका आणि नाट्य अभिनेते गिरीश परदेशी यांच्या वडिलांचे २६ नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले आहे.गिरीश परदेशी यांनी अनेक चित्रपटातूनमुख्य नायकाची भूमिका दिसला आहे.

फॉरेनची पाटलीन या गाजलेल्या चित्रपटात गिरीश यांनी मुख्य भूमिका निभावली होती.हा चित्रपट खुप चर्चेत आले होते.झी मराठी या चॅनेलवरील ‘या सुखांनो या’ या मालिकेत देखील गिरीश परदेशी मुख्य भूमिकेत होता.

त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी त्यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन कळवली होती.त्यांनी पोस्ट मध्ये असे लिहले होते ‘नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांचे वडील अनंत प्रवासास निघून गेले.अत्यंत आदर्श,समाधानी व परिपूर्ण आयुष्य ते जगले! त्यांच्या प्रत्येक वाटचालीत पावलोपावली त्यांनी आधार,प्रेम आणि मार्गदर्शन दिले आणि देत राहील!’

सुरुवातीला त्यांनी पुण्यातील थेटर मध्ये काम करत असताना नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये त्यांची निवड झाली होती.यामधूनच त्यांची मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ओळख निर्माण झाली.यानंतर त्यांनी ‘कोरा कागज’ या हिंदी मालिकेतुन त्यांचे छोट्या पडद्यावर आगमन झाले आणि ते घराघरात पोहचले.

त्यानंतर त्यांनी ‘फॉरेनची पाटलीन’ या चित्रपटात काम केले.हा प्रवास सुरु असतांनाच त्यांनी काही तरी वेगळे करण्याचे ठरविले आणि चित्रपट सृष्टी सोडून त्यांनी नाट्यसृष्टीची निवड केली.आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.