Home » बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित ‘या’ अभिनेत्याचा करते प्रचंड तिरस्कार,नाव ऐकून थक्क व्हाल…!
Celebrities

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित ‘या’ अभिनेत्याचा करते प्रचंड तिरस्कार,नाव ऐकून थक्क व्हाल…!

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित ला ओळखले जाते.बॉलिवूडमधील या धक धक गर्ल ने अनेक दशके सुपरस्टार प्रमाणे चित्रपटसृष्टीवर राज्य केले.आपल्या उत्कृष्ट अभिनय व नृत्यामुळे माधुरी दीक्षित ही प्रत्येक निर्माता व दिग्दर्शकाची एकेकाळी पहिली पसंती होती व आज सुद्धा माधुरीच्या नावाची जादू बघायला मिळते.विवाहानंतर माधुरी अनेक वर्षे अमेरिकेत वास्तव्यास होती व पुन्हा एकदा तिने चित्रपट सृष्टीत कमबॅक  केले आहे.

माधुरी दीक्षित चे बॉलीवूड मध्ये अनेक अभिनेते फॅन आहेत.माधुरी दीक्षितला एका अशा अभिनेत्या विषयी तिरस्कार असून तिला त्याचे तोंडही बघायचं नाही.हा अभिनेता म्हणजेच संजय दत्त होय.काय कारण आहे ज्यामुळे माधुरीला संजय दत्तचे तोंड पाहण्याचीही  इच्छा नाही हे आज आपण जाणून घेणार आहोत.

एक काळ असा होता जेव्हा माधुरी दीक्षित संजय दत्तच्या प्रेमामध्ये होती व हे दोघे एकमेकांना डेट सुद्धा करत होते. या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा व विवाहाच्या चर्चा ही बॉलीवुडमध्ये रंगल्या होत्या.संजय दत्त ची पहिली पत्नी रिचा हिच्यासोबत विभक्त होण्यामागचे कारण हे माधुरीचं असल्याचे सांगितले जाते.

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे एकमेकांच्या अखंड प्रेम मध्ये असतात व अचानक एकमेकांपासून वेगळे होतात व पुढे जाऊन त्यांना एकमेकांचे तोंडही पाहायचे नसते.संजय दत्त आणि माधुरी दीक्षित हे दोघेही याच प्रकारात मोडतात.संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले व या चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान ते एकमेकांना डेट हि करत होते.

मात्र काही काळानंतर हे नाते तुटले व हे दोघेही वेगवेगळ्या वाटांनी पुढे गेले.माधुरी दीक्षित ने कधीही या नात्याला अधिकृतपणे स्वीकार केले नाही.मात्र संजय दत्तने खुद्द एका मुलाखतीमध्ये आपण माधुरी दीक्षित ला सुद्धा डेट केल्याचे सांगितले आहे. या मुलाखतीमध्ये त्याला माधुरी दीक्षित सोबत च्या संबंधांबद्दल विचारले असता त्याने सांगितले की काही काळ मी माधुरी दीक्षितला डेट केले आहे . माधुरी ने मात्र ही सर्व माहिती खोटी असल्याचे सांगितले आहे.