Home » मुकेश अंबानी आपल्या कुकला देतात इतका पगार,आकडा ऐकून व्हाल थक्क…
Celebrities

मुकेश अंबानी आपल्या कुकला देतात इतका पगार,आकडा ऐकून व्हाल थक्क…

भारतामध्ये जेव्हा श्रीमंत लोकांची किंवा ऐषोरामात जगण्याची चर्चा होते तेव्हा अग्रक्रमाने नाव येते अंबानी कुटुंबीयांचे.मुकेश अंबानी हे भारतामधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असून जगभरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मध्ये सुद्धा मुकेश अंबानी यांचा क्रमांक पहिल्या काही श्रीमंत व्यक्तींमध्ये येतो.यामुळेच त्यांचे आयुष्य हे अतिशय सुखसुविधा व ऐषोरामाचे आहे.मुकेश अंबानी कुटुंबीयांमध्ये सर्वच सदस्य हे अतिशय अनोखी शैलीमध्ये आपले आयुष्य जगतात.मुकेश अंबानी हे सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.मुकेश अंबानी हे आपल्याकडे नोकरीला असलेल्या प्रत्येक व्यक्ती ला लाखो रुपये पगार देत असतात. त्यांच्या कुकच्या पगाराबद्दल सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल होत आहेत.

मुकेश अंबानी यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट अतिशय आलिशान असते मग त्याला त्यांचे घर कसे वावगे ठरेल.अंबानी राहत असलेल्या घराचे नाव एंटिलिया असून हे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक मानले जाते.या घराचे मूल्य साधारण  पाचशे कोटी रुपये इतके आहे.मुकेश अंबानी हे सध्या त्यांच्या नोकरांना दिल्या जाणाऱ्या लाखो रुपयांच्या पगारामुळे चर्चेत आहेत. आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या सर्व नोकरांमध्ये त्यांच्या घरातील कुकला सर्वाधिक पगार दिला जातो असे समजते.

मुकेश अंबानी हे आपल्या घरातील काम करणाऱ्या लोकांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतात व त्यांच्या साठी अपघात विमा,आरोग्यविमा यांची तरतूदही केलेली असते.एकंदरीतच एखाद्या सरकारी नोकरीमध्ये ज्या सुविधा नोकरदारांना दिल्या जातात त्या मुकेश अंबानी आपल्या नोकरांना देतात.मुकेश अंबानी हे जगातील काही श्रीमंत लोकांपैकी आहेत व त्यांच्या घरामध्ये असलेल्या नोकरांना ते अतिशय चांगला पगार देतात.अंबानी यांच्या घरातील एका कुकला  महिना तीन लाख रुपये इतका पगार दिला जातो व अन्य सुविधा पुरवल्या जातात.