Home » मुकेश अंबानी यांच्या सोबत विवाह करण्यासाठी नीता अंबानी यांनी ठेवली होती ही अट…
Celebrities

मुकेश अंबानी यांच्या सोबत विवाह करण्यासाठी नीता अंबानी यांनी ठेवली होती ही अट…

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी हे त्यांच्या उद्योग जगतातील कामगिरीमुळे नेहमी चर्चेत असतात.मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या त्यांच्या श्रीमंती राहणीमान व महागड्या  छंदांमुळे नेहमीच माध्यमांच्या आकर्षणाचे केंद्र असतात.मुकेश अंबानी व नीता अंबानी यांची प्रेम कहानी ही एखाद्या चित्रपटाच्या स्टोरी पेक्षा कमी नाही.अंबानी यांची पत्नी म्हणून नीता यांची निवड ही मुकेश यांच्या आई कोकिलाबेन अंबानी यांनी केली होती.

नीता अंबानी  या एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये वाढलेल्या होत्या.नीता यांनी मुकेश अंबानी यांच्या सोबत विवाह करण्यासाठी धीरूभाई अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी यांच्यासमोर एक अट ठेवली होती. विवाह अगोदर नीता अंबानी या एका शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी करत होत्या. या नोकरी मध्ये त्यांना महिना आठशे रुपये इतके वेतन मिळत असे.त्याचप्रमाणे त्यांना नृत्यामध्ये सुद्धा विशेष रुची होती व त्या भरतनाट्यम मध्ये पारंगत होत्या.

एका नृत्याच्या कार्यक्रमाच्या वेळी सर्वात प्रथम नीता अंबानी यांना धीरूभाई अंबानी व कोकिलाबेन यांनी पाहिले होते व त्यानंतर त्यांची भेट मुकेश अंबानी यांच्याशी घालून दिली.मुकेश अंबानी यांनी निता यांना लग्ना विषयी विचारले तेव्हा त्यांनी होकार तर दिला पण कोकिलाबेन आणि धीरूभाई अंबानी समोर त्यांनी एक अट ठेवली.नीता अंबानी यांना शिकवण्याची खूप आवड होती व त्यांना अशी भीती वाटत होती की विवाहानंतर त्यांना शिक्षिकेची नोकरी करू दिली जाणार नाही.

म्हणून त्यांनी अशी अट ठेवली होती की विवाहानंतर सुद्धा त्या शिक्षिकेची नोकरी करतील.जेव्हा अंबानी कुटुंबियांनी या अटीला मान्य केले तेव्हाच त्यांनी विवाहासाठी होकार दिला.विवाहानंतर सुद्धा त्या एका खाजगी शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होत्या. नीता अंबानी या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेत असतात तसेच त्या त्यांच्या महागडी घड्याळे आणि बॅग मुळे सुद्धा चर्चेत असतात.त्यांना महागडी घड्याळे व बॅग घेण्याची खूप आवड आहे.