Home » ‘या’ अभिनेत्यासोबत झाला होता रश्मिका मंदानाचा साखरपुडा,परंतु या कारणामुळे तुटला…!
Celebrities

‘या’ अभिनेत्यासोबत झाला होता रश्मिका मंदानाचा साखरपुडा,परंतु या कारणामुळे तुटला…!

अभिनेत्री रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य चित्रपटा प्रमाणे बॉलीवूड मधील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.रश्मिका मंदांना ही अगदी सुरुवातीपासूनच भारताचा नेशनल क्रश म्हणून ओळखली जाते.सोशल मीडियावर रश्मिका नेहमीच हिट राहिली आहे.पुष्पा या चित्रपटाच्या यशानंतर बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींना ही रश्मिका टक्कर देत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये रश्मिका खूप लोकप्रिय आहे कारण रश्मिका नेहमीच प्रसारमाध्यमांना अगदी हसत मुखाने व मोकळेपणाने सामोरी जाते.

आपल्या चाहत्यांशी सुद्धा ती अतिशय आपुलकीने वागते मात्र एक काळ असा होता जेव्हा रश्मिका वैयक्तिक आयुष्यामध्ये अतिशय दुःखी व निराश झाली होती.रश्मिका ने अभिनय केलेला पहिला चित्रपट किरिक पार्टी या चित्रपटातील अभिनेता रक्षित शेट्टी च्या प्रेमामध्ये रश्मिका त्यावेळी अतिशय वेडी झाली होती.हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते व एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याचे त्यांनी ठरवले.या दोघांचा साखरपुडा झाला मात्र साखरपुड्याच्या 14 महिन्यानंतरच हे नाते संपले.

या दोघांमध्ये लग्नाच्या अगोदरच अनेक प्रकारचे मतभेद निर्माण होत होते व यामुळेच हा साखरपुडा तोडल्याचे समोर आले.मात्र साखरपुडा मोडल्यानंतर रश्मिका ला खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले.यावेळेस रश्मिका अतिशय कठीण प्रसंगातून पुढे जात होती.दीर्घकाळ मौन बाळगल्यानंतर रश्मिका ने अखेरीस समोर येऊन असे म्हटले होते की मी खूप काळ झाला स्वतःबद्दल विविध प्रकारच्या कहाण्या ऐकत आहे.मात्र चाहत्यांनी आम्हाला समजून घेतले पाहिजे.प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात.या कठीण टप्प्यावर रश्मिका ने स्वतःला कामामध्ये झोकून दिले व आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेतला.