Home » ‘या’ कारणामुळे मुकेश अंबानी यांनी केले ८०० रुपयांची नोकरी करणाऱ्या नीता अंबानी सोबत लग्न…
Celebrities

‘या’ कारणामुळे मुकेश अंबानी यांनी केले ८०० रुपयांची नोकरी करणाऱ्या नीता अंबानी सोबत लग्न…

केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगभरातील श्रीमंत लोकांच्या यादीत अग्रस्थानी असलेले मुकेश अंबानी हे त्यांच्या श्रीमंती सोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील साधेपणामुळे सुद्धा ओळखले जातात.रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन असलेले मुकेश अंबानी यांनी अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या उद्योग समूहाचे शिक्कामोर्तब केले आहे. मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय हे नेहमीच त्यांच्या राहणीमानामुळे चर्चेत असतात.मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी व मुलगी ईशा अंबानी यांच्या विवाहाच्या चर्चा सुद्धा संपूर्ण जगभरामध्ये झाल्या होत्या.

या दोघांच्याही लग्नामध्ये मुकेश अंबानी यांनी अगदी पाण्यासारखा पैसा ओतला होता. हे दोन्ही विवाह सोहळे या संपूर्ण शतकातील महागड्या व भव्यदिव्य सोहळा यांपैकी एक मानले जातात .आपल्या मुलांच्या लग्नाचा थाट इतका राजेशाही करणाऱ्या मुकेश अंबानी यांचा विवाह कसा झाला होता याबद्दल निश्चितच उत्सुकता वाटते. आज आपण नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या विवाहाबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

नीता व मुकेश अंबानी यांच्या विवाहातील काही छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर उपलब्ध खूपच व्हायरल झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये मुकेश अंबानी यांनी आपल्या विवाहामध्ये सूट घातला असून निता या खूपच पारंपारिक व साध्या अंदाजात दिसत आहेत.नीता अंबानी सध्या आघाडीच्या उद्योजिकां पैकी एक असून त्या त्यांच्या सौंदर्यासाठी सुद्धा ओळखल्या जातात.मुकेश अंबानी यांनी आपले पिता धीरूभाई अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज चा वारसा पुढे चालवला आहे.धीरूभाई अंबानी यांनी स्वतः मुकेश अंबानी यांच्यासाठी नीता अंबानी यांची पत्नी म्हणून निवड केली होती.

त्या वेळी नीता अंबानी या एका शाळेमध्ये आठशे रुपये दर महिना इतक्या पगारावर काम करत होत्या.त्यावेळी नीता अंबानी यांचे वय 22 वर्षे होते तर मुकेश अंबानी यांचे वय 28 वर्षे होते. या दोघांमध्ये सहा वर्षाचे अंतर आहे.विवाहानंतर सुद्धा नीता अंबानी शाळेमध्ये नोकरी करत होत्या. मात्र मुले झाल्यानंतर त्यांनी ही नोकरी सोडली व आपल्या मुलांच्या संगोपनाच मध्येच त्यांनी पूर्ण वेळ दिला. नीता व मुकेश अंबानी यांचा विवाह 5 मार्च 1985 रोजी झाला.

या दोघांच्याही विवाहाला आता 36 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांना आता तीन मुले असून नीता अंबानी व मुकेश अंबानी यांच्या मुलांची नावे आकाश ईशा व अनंत अशी आहेत.यापैकी आकाश अंबानी ने 2019 साली श्लोका मेहता या आपल्या बालपणीच्या मैत्रिणी सोबत विवाहाची गाठ बांधली असून या दोघांना आता पृथ्वी हा मुलगा आहे.यामुळे नीता अंबानी व मुकेश अंबानी हे आता आजी-आजोबा बनले आहेत.ईशा अंबानी यांचा सुद्धा विवाह झाला आहे.