Home » ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांपाठोपाठ जुळ्या मुलांना गमावलं…!
Celebrities

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांपाठोपाठ जुळ्या मुलांना गमावलं…!

बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्सनी आत्तापर्यंत आपले वेगळे स्थान मिळवले आहे.यामध्ये त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी ची साथ निश्चितच खूप मोठी आहे.फिरोज खान हे ऐंशीच्या दशकातील एक देखणे व रुबाबदार व्यक्तिमत्व होते.त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ज्या भूमिका केल्या त्या आज सुद्धा अतिशय लोकप्रिय आहेत.त्यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगा फरदीन खान यांनीसुद्धा बॉलिवूडमध्ये आपल्या वडिलांचे होम प्रॉडक्शन असलेल्या जानशीन या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले मात्र हा चित्रपट फारशी कमाल दाखवू शकला नाही.

मात्र  फरदीनचे लूक्स तरुणींमध्ये खूपच प्रसिद्ध झाले व तो या ठिकाणी काही काळ स्थिर झाला.त्याने प्यार तूने क्या किया,लव के लिये कुछ भी करेगा,फिदा,यासारख्या चित्रपटांमधून फरदीनचे दर्शन झाल्यानंतर अचानक बॉलीवूड पासून तो दुरावला.काही वर्षांपूर्वी त्याचे नाव कथित ड्र’ग्स प्रकरणी समोर आले होते व त्याला तुरुंगात जावे लागले होते.बॉलीवूड पासून दूर राहिल्यानंतर फरदीन खान चा अवतार पूर्णपणे बदलला होता व तो फिट पासून फॅट या कॅटेगिरीकडे वळला होता.

काही वर्षांपूर्वी त्याची काही छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती यामध्ये तो खूपच लठ्ठ व वयापेक्षा खूपच वृद्ध दिसत होता.त्याच्या या छायाचित्रांवर चाहत्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या होत्या.मात्र नंतर फरदीनने पुन्हा एकदा स्वतःमध्ये मोठे ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणले व पुन्हा फिट या अवतारात तो लोकांसमोर आला.लवकरच तो पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.मात्र या सर्व काळामध्ये तो खूप मोठ्या घटना आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घडल्याचे सांगत आहे.

फिरोज खान हे फरदीन च्या सर्वात जवळ होते.वडिलांपेक्षाही त्याचे फिरोज खान यांच्यासोबत मित्रत्वाचे नाते होते.2009 साली फिरोज खान यांचे निधन झाले व त्यानंतर आयुष्यामध्ये सर्वात मोठा धक्का बसला असे त्याने सांगितले.त्यानंतर  बराच काळ हा नैराश्य मध्ये घालवला असे फरदीन सांगतो.फरदीनने ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांची मुलगी नताशा सोबत विवाह केला आहे.नताशा आणि फरदीन  यांना दोन जुळी मुले झाली होती.

मात्र अवघ्या सहा महिन्यांमध्ये या मुलांनी जगाचा निरोप घेतला.हा दुसरा आघात फरदीनच्या कुटुंबियांवर होता व हे दुःख पचवणे त्याच्यासाठी खूप अवघड होते.मात्र नंतरच्या काळामध्ये त्याच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला व या मुली मुळे हे कुटुंब सावरले.फरदीनने आपल्यामध्ये घडवून आणलेल्या कायापालट नंतर त्याला पुन्हा एकदा बॉलिवूडचे वेध लागले आहेत व प्रेक्षकांनाही त्याला नवीन इनिंगमध्ये पाहण्याची उत्सुकता आहे.