Home » रजनीकांतची मुलगी आणि अभिनेता धनुष हे १८ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर झाले विभक्त,ही अभिनेत्री आहे कारण…
Celebrities

रजनीकांतची मुलगी आणि अभिनेता धनुष हे १८ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर झाले विभक्त,ही अभिनेत्री आहे कारण…

प्रसिद्ध अभिनेता धनुष आणि निर्माती व दिग्दर्शिका ऐश्वर्या रजनीकांत हे चित्रपट सृष्टी तील सर्वात सुंदर कपल्सपैकी एक मानले जाते.या दोघांनी गेल्या काही दिवसांपूर्वी विभक्त होण्याचा निर्णय घेतला व या दोघांनी घटस्फोटाच्या घेतल्याचे एकत्रितपणे जाहीर केले आहे.धनुष आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटा घ्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.धनुष आणि ऐश्वर्या हे अठरा वर्षे वैवाहिक नात्यामध्ये आहेत.

ऐश्वर्या आणि धनुष हे 2000 साली भेटले.या दोघांची पहिली भेट आणि प्रेमकहाणी ही कपल गोल्ड देणारी आहे.ऐश्वर्या रजनीकांतने धनुष आणि आपली भेट होणे हे देवाची मर्जी असल्याचे एकदा मुलाखतीमध्ये म्हटले होते.ऐश्वर्या आणि धनुष ची पहिली भेट ही धनुषच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी ऐश्वर्या अल्बर्ट थिएटरला गेली होती त्यावेळी झाली.ऐश्वर्या धनुषचा अभिनय पाहून खूपच प्रभावित झाली.तिने धनुषला काही फूले पाठवली व यानंतर धनुषने तिला भेटून कामाचे कौतुक केल्याबद्दल आभार मानले.

ऐश्वर्या आणि धनुष यांच्यामध्ये हळूहळू मैत्री वाढू लागली.त्यानंतर या दोघांनी विवाह केला.या अठरा वर्षांच्या वैवाहिक जीवनात ऐश्वर्या आणि धनुष हे एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत गेले आणि त्यांचे नाते अधिक घट्ट झाले.या दोघांना दोन मूले असून त्यांची नावे यत्र आणि लिंगा अशी आहेत.ऐश्वर्या रजनीकांत ला  2015 साली थ्री या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी धनुष आणि त्याची सहकलाकार श्रुती हसन यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय होता.

या चित्रपटातील प्रेम प्रसंग चित्रित करताना धनुष आणि श्रुती हे यामध्ये खूपच वहावत गेल्याचे सांगितले जाते.या प्रकरणावर ऐश्वर्या रजनीकांत ने मात्र या विषयावर कधीही सार्वजनिक रीत्या भाष्य केले नाही.धनुष चे नाव त्रिशा या अभिनेत्री सोबत ही जोडले गेले होते.2015साली त्रिशा आणि वरुण मणियन यांनी आपल्या साखरपुड्याची घोषणा केली होती मात्र नंतर हे दोघे वेगळे झाले व यामागचे कारण त्रिशा आणि धनुष चे संबंध असल्याचे सांगितले जाते.