Home » लाखो कॅन्सर ग्रस्त गरिबांचे इलाज करणारा ‘रिअल लाईफ हिरो’
Celebrities

लाखो कॅन्सर ग्रस्त गरिबांचे इलाज करणारा ‘रिअल लाईफ हिरो’

विवेक ओबेरायचे नाव हे अयशस्वी किंवा फ्लॉप अभिनेत्यांमध्ये घेतले जाते मात्र सध्या विवेक ओबेराय हा एका वेगळ्याच कारणामुळे खूप चर्चेत आला आहे.विवेक चित्रपट किंवा ग्लॅमर क्षेत्रातील कुठल्या बातमीमुळे नव्हे तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.दर वर्षी 4 फेब्रुवारीला कॅन्सर दिन साजरा केला जातो.या निमित्ताने अनेक सेलिब्रिटी कॅन्सर पीडितांसाठी मदत करत असतात.त्यांच्यासाठी वेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात यामध्ये विवेक ओबेराय सुद्धा सहभागी होत असतो.

विवेक ओबेराय चे कॅन्सर पीडितांसाठी चे योगदान खूप मोठे आहे.गेल्या अठरा वर्षांपासून विवेक ओबेराय ने तब्बल अडीच लाख कॅन्सर ग्रस्त रुग्णांसाठी आर्थिक मदत केली आहे.अठरा वर्षांपूर्वी विवेक ओबेराय ने आपला वाढदिवस कॅन्सरग्रस्त मुलांसोबत साजरा केला होता.या वेळी या मुलांना पाहून तो खूप भावूक झाला होता व त्या क्षणापासून त्याने कॅन्सर पीडित मुलांची मदत करण्याचे ठरवले.गरीब शेतकरी व अन्य गरजू लोकांच्या मुलांना ज्यांना कॅन्सर चे उपचार घेणे शक्य नाही त्यांच्यासाठी विवेक नेहमीच आर्थिक मदत करत असतो.

ओबेराय कॅन्सर असोसिएशन या संस्थेमार्फत विवेक हे सर्व कार्य गेली 18 वर्षे करत आहे.टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या बाहेर कॅन्सरचे उपचार घेणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक राहण्याच्या व खाण्याच्या सोयीअभावी अतिशय त्रासाला सामोरे जात असतात.या सर्व लोकांना आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून विवेक राहण्याची सोय करून देतो व त्यांच्या खाण्यापिण्याची ही सुविधा उपलब्ध करून देतो.कॅन्सर रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना भेटून विवेक या लोकांच्या उपचारांसाठी तो काही आर्थिक मदत करू शकतो का ज्यामुळे त्यांच्यावर विनामूल्य उपचार केले जाऊ शकतील यासंदर्भात वेळोवेळी मीटिंग घेत असतो.

कॅन्सर रुग्णांसाठी ची औषधे खूप महाग असतात त्यामुळे ही औषधे त्यांच्यापर्यंत स्वस्त दरात पोहोचावी यासाठी काही उपक्रम राबवता येईल का यासाठी त्याची संस्था कार्यरत आहे.विवेक ओबेराय हे सर्व काम कुठल्या ही प्रसिद्धी शिवाय करत आहे हे विशेष.विवेकच्या चित्रपटसृष्टीतील करिअर बद्दल बोलायचे झाले तर सध्या तो अभिनय क्षेत्र पासून खूप दूर आहे व त्याला पडद्यावर शेवटचे ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटात पाहिले गेले होते.