Home » शाहरुख खानला अंडरवर्ल्ड पासून वाचवले होते ‘या’ अभिनेत्याने…!
Celebrities

शाहरुख खानला अंडरवर्ल्ड पासून वाचवले होते ‘या’ अभिनेत्याने…!

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांची काही किस्से खूप प्रसिद्ध आहेत.आज आपण बॉलिवूडमधील बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खान शी निगडित एक किस्सा जाणून घेणार आहोत.हा किस्सा त्या काळातला आहे जेव्हा शाहरुख मुंबईमध्ये बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी आला होता मात्र मुंबईतील माफिया वर्ल्ड त्याला मागे खेचण्यासाठी हर एक प्रयत्न करत होते.या कठीण काळामध्ये शाहरूखला आधार दिला आहे एका बॉलिवूड मधील व्यक्तीने.

या व्यक्तीने शाहरुखला अगदी ठामपणे सांगितले होते की तुला कोणीही त्रास दिला तर तू कोणताही विचार न करता माझ्याकडे ये तुला कोणी हात सुद्धा लावू शकणार नाही.ही व्यक्ती म्हणजे बॉलिवूडमधील एक अभिनेता आहे.हि व्यक्ती नक्की कोण हे आपण जाणून घेणार आहोत.

शाहरुख खान आज घडीला बॉलिवूडमधील नव्हे तर संपूर्ण जगभरातील काही लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो.मात्र एक काळ असा होता जेव्हा त्याला पाठिंबा देणारे या इंडस्ट्रीमध्ये कोणीच नव्हते.स्वतः शाहरुख खानने एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे.तो जेव्हा बॉलिवूडमध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करत होता त्या काळामध्ये त्याचे काही व्यक्तींसोबत मतभेद झाले होते यामुळे त्याला अनेक कठीण प्रसंगांचा  सामना करावा लागला.

शाहरुख ज्यावेळी दिल्लीतून मुंबईमध्ये आला त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे कुटुंबिय नव्हते व बॉलिवूडमध्ये कोणी जवळचा मित्रही नव्हता.मात्र त्यावेळी खरा मित्र म्हणून संजय दत्त ने आपली साथ दिल्याचे शाहरुखने सांगितले.संजय त्यावेळी आपल्याकडे आला व माझा हात हातात घेऊन त्याने तुला इथे कुणी हात जरी लावला तरी त्याची गाठ माझ्यशी आहे असे सांगितले व  एका सच्चा मित्राचे कर्तव्य संजय दत्त ने नेहमी पार पाडले.

संजय दत्त ने सुद्धा या संदर्भात एकदा सांगितलं होते.संजय दत्त असे म्हणाला होता की शाहरुख खान ज्यावेळी बॉलीवूडमध्ये नवीन नवीन आला होता त्यावेळी त्याला मी सांगितले होते की तुला कोणत्या गोष्टीची गरज लागली तर तू माझ्याकडे विनासंकोच माग मी नेहमी तुझ्या सोबत असेल.तुला गाडी पाहिजे तर माझी गाडी ठेवून घे मी तुझा भाऊ आहे.संजय दत्त हा शाहरुख खानचा खूप जुना मित्र आहे मात्र अद्यापही या दोघांनी एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही.मात्र त्यांच्या दोस्ती चे किस्से खूप प्रसिद्ध आहेत.

About the author

Being Maharashtrian