Home » हिंदी चित्रपट सृष्टीत पसरली शोककळा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन…
Celebrities

हिंदी चित्रपट सृष्टीत पसरली शोककळा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन…

बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची प्रशंसा झालेला अभिनेता बलविंदर सिंग धामी याने या जगाचा निरोप घेतला.या अभिनेत्याने २६ नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला.

बालविंदर सिंग यांनी चित्रपट आणि मालिका या दोन्ही माध्यमामध्ये आपला ठसा उमटवला आहे.त्यांनी ९० च्या दशकात प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.बलविंदर सिंह धामी १९९१ मध्ये आलेल्या ‘हफ्ता बंधन’ या चित्रपटात दिसला होता.

या चित्रपटात त्याच्यासोबत जॅकी श्रॉफ होते.याशिवाय १९९३ मध्ये रिलीज झालेल्या ‘सैनिक’ आणि ‘परवान’ या चित्रपटातही तो दिसला होता.बालविंदर सिंग यांनी हफ्ता बँड,सैनिक,दुर्घटना,जण तेरे नाम,इना मीना डीका या चित्रपटामध्ये काम केलेले आहे.आणि टीव्ही वरील ‘झी हॉरर शो’ मध्ये देखील काम केलेले आहे.

About the author

Being Maharashtrian