Home » हृतिक रोशन करणार सोळा वर्षाने लहान असणाऱ्या ‘या’ अभिनेत्री सोबत दुसऱ्यांदा लग्न…!
Celebrities

हृतिक रोशन करणार सोळा वर्षाने लहान असणाऱ्या ‘या’ अभिनेत्री सोबत दुसऱ्यांदा लग्न…!

बॉलीवूड मधील सुपरस्टार ची लग्न आणि विभक्त होणे हे आता नवीन राहिलेले नाही.गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटींनी आपल्या जोडीदारासोबत विभक्त होऊन पुन्हा नवीन जोडीदारासोबत विवाहाची गाठ बांधली आहे.यापैकीच एक अभिनेता म्हणजे फरहान अख्तर होय.फरहान अख्तर आणि शिवानी दांडेकर यांच्या लग्नाच्या बातम्यांनी सध्या प्रसार माध्यमांमध्ये जोर धरला आहे.

यामध्येच आता फरहानचा सहकलाकार असलेला बॉलिवूडमधील हँडसम हिरोज मध्ये गणला जाणारा हृतिक रोशन सुद्धा फरहानच्या पावलावर पाऊल टाकत पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे.त्याची भावी पत्नी व प्रेयसी सबा आजाद त्याच्यापेक्षा तब्बल सोळा वर्षांनी लहान आहे.हृतिक आपल्या दिसण्यामुळे,नृत्यामुळे व अभिनयामुळे नेहमीच तरुणींमध्ये लोकप्रिय राहिला आहे.

अगदी पहिल्या चित्रपट कहो ना प्यार है पासून रितिक रोशन हा तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला आहे.हृतिकने कभी खुशी कभी गम,धूम,जोधा-अकबर यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत,आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच मौन बाळगणारा हृतिक त्याच्या पत्नी सोबत सुझैन खान सोबत झालेल्या घटस्फोटामुळे चांगलाच चर्चेत आला होता.सुझैन आणि हृतिक रोशन हे हृतिकच्या बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर पासून रिलेशनशिपमध्ये  होते व आपण दिलेल्या वचनाला जागते हृतिकने पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्याबरोबर सुझैन सोबत विवाहही केला होता.

या दोघांना दोन मुलेसुद्धा आहेत मात्र यानंतर या दोघांच्या वैवाहिक जीवनामध्ये मतभेद निर्माण झाले.या मतभेदांना हृतिकच्या अफेअरची किनार सुद्धा देण्यात आली.यामध्ये कंगना राणावत,बार्बरा मोरी,करीना कपूर यांची नावे हृतिक सोबत जोडण्यात आली.कंगना राणावत आणि हृतिक च्या कथित अफेअर मुळे सुझैन चांगलीच दुखावली होती.या दोघांनी घटस्फोट घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला मात्र मुलांसाठी अनेकदा हे दोघे एकत्र दिसून येतात.

सुझैन सोबत विभक्त झाल्यानंतर हृतिक रोशन बऱ्याच काळानंतर नुकताच एका रेस्टॉरंट मध्ये सबा सोबत दिसून आला.यावेळी हे दोघेजण एकमेकांच्या अतिशय जवळ होते हे कॅमेऱ्यांनी टिपले.सबा ही एक अभिनेत्री व थेटर म्युझिक ची दिग्दर्शिका आहे. सबा आणि हृतिक कडून आपल्या नात्याविषयी अधिकृतपणे कोणतेही स्पष्टीकरण आले नाही.मात्र त्यांच्या निकटवर्तीयांनी असे सांगितले आहे की हृतिक येत्या काही दिवसांमध्ये सबा सोबत विवाह करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे व सबा हृतिकच्या कुटुंबीयांना सुद्धा नेहमी भेटत असते.