Home » १८०० विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी ‘पुनीत राजकुमार’ यांनी अगोदरच करून ठेवली होती चक्क इतक्या कोटीची FD…
Celebrities

१८०० विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी ‘पुनीत राजकुमार’ यांनी अगोदरच करून ठेवली होती चक्क इतक्या कोटीची FD…

‘ज़ो आवडतो सर्वांना,तोची आवडे देवाला’ या ओळी काही व्यक्तींच्या बाबतीत अगदी या आधुनिक युगात सुद्धा तंतोतंत लागू होतात.काही व्यक्ती या आपले संपूर्ण आयुष्य तर इतरांच्या भल्यासाठी व्यतीत करतात मात्र मृ’त्यू’नं’तरही या लोकांची आबाळ होऊ नये म्हणून फार मोठी तरतूद करून जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार होय.

पुनीत राजकुमार यांनी आपल्या जिवंत पणी जे काही सामाजिक कार्य हाती घेतले होते त्यामध्ये भविष्यात काही कारणामुळे अडथळा निर्माण झाला तरीदेखील हे कार्य असेच अविरतपणे चालू राहावे यासाठी आठ कोटी रुपयांची एफ डी त्यांनी काढली होती असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

पुनीत राजकुमार यांचे गेल्या शुक्रवारी अकस्मातपणे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.पुनीत राजकुमार हे केवळ चित्रपटामध्ये नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यातही खऱ्या अर्थाने हिरो होते.पुनीत राजकुमार यांनी सामाजिक जाणीव जागृत ठेवत अनेक अनाथ आश्रम,गोशाळा,शिक्षण संस्था,वृद्धाश्रम सुरू केले होते व जवळपास अठराशे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा त्यांनी उचलली होती.

को’रो’ना च्या काळामध्ये पीडितांसाठी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली होती व वेळोवेळी ज्या घटकांना आवश्यकता असेल त्यांच्यासाठी भरघोस मदत पुनीत राजकुमार करत असत.पुनीत राजकुमार यांच्या अशा अचानक जाण्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्यांमध्ये बाधा निर्माण होईल असे वाटत असतानाच त्यांनी आपल्या जिवंतपणीच अशा प्रकारची आर्थिक तरतूद केली होती यावरून त्यांची  दूरदृष्टी दिसून येते.