Home » अब्जावधींची संपत्ती असून देखील रतन टाटा यांचे भाऊ जिमी टाटा जगतात असे जीवन…!
Celebrities

अब्जावधींची संपत्ती असून देखील रतन टाटा यांचे भाऊ जिमी टाटा जगतात असे जीवन…!

टाटा उद्योग समूह हा केवळ भारतामध्येच नव्हे तर परदेशातील यशस्वी उद्योगांपैकी एक मानला जातो.टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा हे सुद्धा एक आघाडीचे उद्योजक म्हणून नेहमी चर्चेत असतात.मात्र खूप कमी लोकांना माहीत असेल की रतन टाटा यांचे एक भाऊ सुद्धा आहेत.रतन टाटा यांच्या भावाचे नाव जिमी टाटा असे आहे व ते मुंबईतील एका दोन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहतात व अतिशय साधेपणाने आपले आयुष्य जगत आहेत.ते कोणीही मोठे उद्योजक नाहीत व त्यांच्याकडे साधा मोबाईल नाही व ते फारसे कोणामध्ये मिसळत नाहीत.

जिमी टाटा यांची चर्चा सध्या रंगली आहे ती आर जी इंटरप्राईजेस चे हर्ष गोयंका यांच्यामुळे.हर्ष गोयंका यांनी जिमी टाटा यांचे छायाचित्र शेअर केले आहे.या छायाचित्रांमध्ये जिमी टाटा एका सोफ्यावर बसलेल्या आहेत.त्या छायाचित्राला शेअर करत हर्ष गोयंका यांनी म्हटले आहे की फार कमी लोकांना माहिती असेल की हे रतन टाटा यांचे भाऊ जिमी टाटा आहेत.ते कुलाबा येथील एका अतिशय साध्या फ्लॅटमध्ये खूप शांत व साधे आयुष्य जगत आहेत.त्यांना व्यापारामध्ये कधीही फारशी रुची नव्हती मात्र स्क्वॅश मध्ये त्यांना खूप रस आहे व नेहमीच ते मला स्क्वॉश मध्ये मात देतात.

हे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी त्यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे तर काही युजर्सचे असे म्हणणे आहे की गरिबीत राहणे व कमी खर्चाचे आयुष्य निवडणे यामध्ये खूप फरक आहे.कमी खर्चाचे आयुष्य जगणे हे एक जिमी यांचा स्वतःचा निर्णय आहे .नव्वदच्या दशकामध्ये निवृत्ती स्वीकारून अतिशय शांत व अलिप्त असे आयुष्य ते जगत आहेत. ते टाटा उद्योग समूहातील समभाग धारक व टाटा उद्योग समूहाचे ट्रस्टी आहेत व यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा खर्च चालतो.

जिमी यांचे भाऊ व यशस्वी उद्योजक असलेले रतन टाटा हे नेहमीच आपल्या निर्णयांमुळे चर्चेत असतात.रतन टाटा हे सध्या 84 वर्षांचे असून आपल्या कर्तबगारीच्या जोरावर वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी ते टाटा उद्योगसमूहाचे चेअरमन बनले होते. टाटा उद्योग समुह हा 100 पेक्षा अधिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असून यामध्ये चहाच्या पावडर पासून ते पंचतारांकित हॉटेल, वाहन उद्योग यामध्ये सुद्धा टाटा उद्योग समूहाने आपले पाय भक्कमपणे रोवले आहे