Home » आर्यन खानच्या वकिलाची फी बघून व्हाल चकित, एक दिवसासाठी घेतली चक्क ऐवढी फी…
Celebrities

आर्यन खानच्या वकिलाची फी बघून व्हाल चकित, एक दिवसासाठी घेतली चक्क ऐवढी फी…

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे फार पूर्वीपासून म्हटले जाते.कोर्टाची पायरी चढावी लागली तर आपल्या बाजूने केस लढणारा हा वकील तितकाच हुशार असणे आवश्यक असते. भारतामधील काही वकिल हे एकही केस न हरण्या साठी प्रसिद्ध आहेत.कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या  केसमध्ये सुद्धा आपल्या अशिलांची सुटका करण्यासाठी या वकिलांची ख्याती आहे.अशा काही  वकिलांपैकी एक म्हणजे सतीश मानशिंदे होय.

सतीश मानशिंदे हे भारतामधील अनेक राजकारणी,सेलिब्रिटी,अभिनेते-अभिनेत्री यांच्यासह काही बड्या हस्ती यांचे वकीलपत्र घेऊन याअगोदर केस लढलेले आहेत.सतीश मानशिंदे यांचे गेल्या काही वर्षांमधील गुन्हेगारी स्वरूपाच्या केसमधील यश हे निश्चितच उल्लेखनीय आहे. मान शिंदे हे त्यांच्या कोर्टातील कामगिरीप्रमाणेच त्यांच्या फीसाठी सुद्धा तितकेच प्रसिद्ध आहेत.

सतीश मानेशिंदे हे एका दिवसासाठी च्या सुनावणीसाठी दहा लाख रुपये इतकी फी घेतात असे सांगितले जाते. दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर एका क्रूज वर चाललेल्या हाय प्रोफाईल पार्टीमध्ये काही बड्या सेलिब्रिटींना ड्र’ग्स चे सेवन केल्याच्या व अंमली पदार्थ जवळ बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा सुद्धा समावेश आहे. सध्या आर्यनला तुरुंगात चौकशीसाठी ठेवण्यात आले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार आर्यन खान च्या जामीनासाठी शाहरुख खानने सतीश मानेशिंदे यांच्याकडे आर्यन ची केस सोपवली आहे.

सतीश मानशिंदे यांनी गेल्या वर्षी सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात रिया चक्रवर्ती वर लावल्या गेलेल्या आरोपांच्या विरोधात रियाच्यावतीने केस लढवली होती व तिला जामीन सुद्धा मिळवून दिला होता.

सतीश मानशिंदे हे मूळचे धारवाडचे असून १९८३ साली त्यांनी आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण करुन ते मुंबईत आले.त्यावेळी श्रीयुत राम जेठमलानी यांच्याकडे ते सहाय्यक म्हणून काम करू लागले. त्या वेळी राम जेठमलानी हे इंडियन बार कौन्सिलचे चेअरमन होते. राम जेठमलानी यांना फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही प्रकारच्या खटल्यांमध्ये सतीश मानशिंदे सहाय्य करत असत. सतीश मानशिंदे यांचे नाव बॉलिवूड आणि विशेषतः हाय प्रोफाइल वर्तुळामध्ये घेतले जाऊ लागले ते संजय दत्तचा १९९३ साली झालेल्या टाडा केसच्या संदर्भातील सुनावणीनंतर.२००७ साली संजय दत्त वर बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर काम करत असलेल्या या टीम मध्ये सुद्धा सतीश मान शिंदे यांचा समावेश होता.

 याव्यतिरिक्त सलमान खानच्या बाजूने सुद्धा सतीश मान शिंदे यांनी केस लढल्या आहेत. हिट अँड रन केस मध्ये सलमान खानला जामीन मिळवून देण्यामध्ये सतीश मानशिंदे यांची प्रमुख भूमिका होती.या व्यतिरिक्त १९९८ साली काळवीट शिकार प्रकरणी सलमान वर जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे ती केस सुद्धा सतीश मान शिंदेच लढणार आहेत.

सेलिब्रिटी च नव्हे तर अन्यही काही उच्चभ्रू केस मध्ये सतीश मान शिंदे यांनी आरोपींची बाजू मांडली आहे. छोटा राजनची पत्नी सुजाता निकाळजे च्या पूर्वनियोजित हत्येप्रकरणी च्या खटला सुद्धा सतीश मानशिंदे यांनी लढला होता.राखी सावंत,दया नायक यांच्या केस सुद्धा सतीश मानशिंदे यांनी लढवल्या आहेत.