Home » या प्रसिद्ध अभिनेत्याने कंगना राणावतच्या ‘आझादी’ च्या विधानाचे केले समर्थन…
Celebrities

या प्रसिद्ध अभिनेत्याने कंगना राणावतच्या ‘आझादी’ च्या विधानाचे केले समर्थन…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या वादग्रस्त विधानाचे मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले आहे.१९४७ मध्ये भारताला जे मिळाले ते ‘भीक’ होते आणि २०१४ मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले,असे ती म्हणाली होती .

महाराष्ट्रातील पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात विक्रम गोखले म्हणाले की,कंगना राणौत जे बोलली ते खरे आहे.ते म्हणाले,मी कंगनाच्या विधानाशी सहमत आहे.आम्हाला स्वातंत्र्य मिळाले.स्वातंत्र्यसैनिकांना फाशी दिली जात असताना (ब्रिटिश राजवटीत) बरेच लोक केवळ प्रेक्षक होते.या मूक प्रेक्षकांमध्ये अनेक ज्येष्ठ नेते होते.इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना त्यांनी वाचवले नाही.

स्वातंत्र्याच्या वक्तव्यानंतर कंगना रणौत म्हणाली – मी पद्मश्री परत करेन तर…

विक्रम गोखले हे मराठी रंगभूमी,बॉलीवूड आणि टीव्हीमध्ये त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात.ते म्हणाले की भारतीय जनता पक्षासह (भाजप) प्रत्येक राजकीय पक्ष वादात आपला फायदा पाहतो.त्रिपुरातील कथित जातीय हिंसाचार आणि त्याविरोधात अमरावती आणि इतर शहरांमध्ये उसळलेला गदारोळ या प्रश्नाला उत्तर देताना गोखले म्हणाले की,जातीय दंगली व्होट बँकेच्या राजकारणाचा परिणाम आहेत.

ते म्हणाले,”प्रत्येक राजकीय पक्ष असे (व्होट बँकेचे राजकारण) करतो.” महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल गोखले म्हणाले,देशाच्या भल्यासाठी माजी मित्रपक्ष- शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकत्र आले पाहिजे.