Home » “पॅक-अपनंतर आम्ही त्यावरचं रक्त काढायचो आणि मंग…”, अमृता खानविलकरने सांगितला चंद्रमुखीच्या शुटिंगदरम्यानचा किस्सा…!
Celebrities

“पॅक-अपनंतर आम्ही त्यावरचं रक्त काढायचो आणि मंग…”, अमृता खानविलकरने सांगितला चंद्रमुखीच्या शुटिंगदरम्यानचा किस्सा…!

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये विविधपूर्ण कथानक आणि धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे.प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक यांच्या चंद्रमुखी या चित्रपटाची साऱ्यांनाच उत्सुकता आहे .प्रसाद ओक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चंद्रमुखी हा चित्रपट प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित आहे.

या चित्रपटामध्ये चंद्रमुखीची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी साकारली आहे.या चित्रपटाला अधिकाधिक वास्तवदर्शी बनवण्यासाठी प्रसाद ओक व चित्रपटातील कलाकारांनी खूप प्रयत्न केले आहेत.या चित्रपटामध्ये चंद्रमुखीच्या लूकसाठी खूप अभ्यास करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये चंद्रमुखीच्या नाकातील नथ खरी असावी यासाठी अमृताला नाक टोचण्यास चित्रीकरणाच्या अगोदरच सांगितले होते.

या चित्रपटात अमृताने पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचे बनवलेल्या भारदस्त नदी परिधान केल्या आहेत.अमृताने या लूकसाठी खूपच मेहनत घेतली आहे. या भारदस्त नथ घालून शूट केल्या नंतर ज्यावेळी ती नथ काढायची असे त्यावेळी त्यांना आधी त्यावरती अक्षरशः रक्त लागलेले असे व ते रक्त अगोदर काढून मग ती नथ काढली जात असे.

या चित्रपटामध्ये खूप आकर्षक अशा नथी अमृताने परिधान केलेल्या आहे व हे सर्व व तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट शेअर केले आहे.या चित्रपटामध्ये चंद्रमुखी सोबत ची दौलतची  भूमिका आदिनाथ कोठारे साकारणार आहे.अमृताने शेअर केलेल्या या लूकला चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी पसंती दर्शवली आहे व तिच्या कष्टांचे कौतुकही केले आहे.