Home » आर्यन खान ची केस लढणार आता ‘हे’ नवे वकील,आज होणार आर्यनच्या जामिनीवर सुनावणी..
Celebrities

आर्यन खान ची केस लढणार आता ‘हे’ नवे वकील,आज होणार आर्यनच्या जामिनीवर सुनावणी..

आर्यन खानच्या जामिनावर आज दुपारी सुनावणी होणार आहे. ड्र’ग्ज प्रकरणामध्ये अडकलेला आर्यन खान सध्या आर्थर रोड कारागृहामध्ये आहे.त्याच्या जामिनासाठी त्याचे वकील माणशिंदें यांनी गेल्या काही दिवसांपासून आर्यन च्या जमिनीसाठी खुप प्रयत्न करत आहे.परंतु प्रत्येक वेळी एनसीबी काही ना काही पेच निर्माण करत आहे.११ ऑक्टोबरला सत्र न्यायालयामध्ये देखील आर्यनला जामीन मिळाला नाही.

आर्यनच्या जामिनासंदर्भात नेमका काय निर्णय होणार,याकडे प्रत्येकाचे लक्ष लागले आहे.आतापर्यंत आर्यन ची केस सतीश मानश‍िंदे हे वकील लढत होते.आता मात्र,ज्येष्ठ वकील अमित देसाई यांना शाहरुख खान ने ही केस लढविण्यासाठी हायर केले आहे.अमित देसाई हे ११ ऑक्टोबरला सतीश मानश‍िंदे यांच्यासोबत न्यायालयामध्ये दिसले होते. 

एनसीबीने तीन दिवसांचा वेळ मागितला होता…

११ ऑक्टोबरला एनसीबी ने आर्यन च्या जामिनीसंदर्भामध्ये बुधवार पर्यंत वेळ मागितला होता.आर्यनचे वकील अमित देसाई आणि सतीश मानशिंदे हे दोघेही सकाळी १०:३० वाजता न्यायालयात पोहोचले होते.यावेळी एनसीबीच्या वतीने लढणारे सरकारी वकील एएम चिमळकर म्हणाले तपास सुरु आहे त्यामुळे पुरावे गोळा करण्यासाठी त्यांना विलंब होत आहे.या युक्तिवादानंतर न्यायाधीश व्ही.व्ही पाटील यांनी एनसीबीला उत्तर दाखल करण्यासाठी १३ ऑक्टोबरला  सकाळी ११ वाजेपर्यंतचा वेळ दिला होता.आता या संदर्भात दुपारी २:४५ वाजता सुनावणी होणार आहे.

शाहरुखच्या ड्रायव्हरचीही चौकशी केली…

यासंदर्भात,एनसीबीने शाहरुख खानच्या ड्रायव्हरची चौकशी केली.हि चौकशी सुमारे १२ तास चालू होती.एनसीबीने आर्यन खान आणि त्याच्या मित्रांसंदर्भात ड्रायव्हरची चौकशी केली.एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,ड्रायव्हरने कबूल केले की त्याने आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना क्रूझ टर्मिनलवर सोडले होते. एनसीबीने ड्रायव्हरचा या जबाबही नोंद केली आहे. 

About the author

Being Maharashtrian