Home » मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानचा जामीन केला मंजुर,यादिवशी होऊ शकते सुटका…
Celebrities

मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानचा जामीन केला मंजुर,यादिवशी होऊ शकते सुटका…

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला तब्बल २५ दिवसांनी जामीन मिळाला आहे. ३ दिवसांच्या युक्तिवादानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान व्यतिरिक्त क्रूझ ड्र’ग्स प्रकरणातील अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी जामीन मंजूर केला.

मात्र, तिघांचीही आर्थर रोड कारागृहातून सुटका उद्या किंवा परवा शक्य होणार आहे. न्यायमूर्ती सांबरे यांनी आपल्या निकालात म्हटले आहे की, तीनही अपीलांना परवानगी आहे. मी उद्या सविस्तर आदेश देईन.” त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी रोख जामीन मंजूर करण्याची परवानगी मागितली,जी न्यायालयाने नाकारली आणि जामीन द्यावा लागेल असे सांगितले. 

न्यायमूर्ती सांबरे म्हणाले, “मी शुक्रवारीही आदेश देऊ शकलो असतो,पण मी आज दिला आहे.” आता आर्यनच्या वकिलांची टीम त्याच्या सुटकेसाठी उद्या लवकर औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. विलंब झाल्यास त्यांची सुटका शनिवारीच शक्य होणार आहे. 

निकालानंतर आर्यनचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले की,माझ्या अशिलाला जामीन मिळाला आहे.उच्च न्यायालयाचा सविस्तर निर्णय आल्यावर उद्या किंवा परवा आर्यनला सोडण्यात येईल, असे ते म्हणाले. त्यामुळे आर्यन खान त्याच्या घरी ‘मन्नत’मध्ये दिवाळी साजरी करू शकणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय त्याचे वडील शाहरुख खान यांचा २ नोव्हेंबरला वाढदिवस आहे. कोर्टाचा हा आदेश शाहरुखसाठी अॅडव्हान्स बर्थडे गिफ्ट ठरू शकतो. आता शाहरुख त्याच्या मुलासोबत  वाढदिवस साजरा करू शकणार आहे.

About the author

Being Maharashtrian