Home » प्रभासची आई वयाच्या ५३ व्या वर्षी देखील दिसते इतकी सुंदर की…!
Celebrities

प्रभासची आई वयाच्या ५३ व्या वर्षी देखील दिसते इतकी सुंदर की…!

असे काही कलाकार आहेत ज्यांनी फार काही चित्रपटांमध्ये काम केले नाही मात्र त्यांच्या पहिल्यावहिल्या चित्रपटांमधून मिळालेले त्यांची लोकप्रियता आज सुद्धा टिकून आहे व त्यांना या चित्रपटामुळे ओळखले जाते.नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री सुद्धा याच मुळे ओळखली जाते.भाग्यश्री ही आजही सुंदर अभिनेत्रींपैकी एक गणली जाते.1989 साली भाग्यश्री चा पहिला चित्रपट मैने प्यार किया प्रदर्शित झाला होता.हा चित्रपट खूप सुपरहिट झाला होता व या चित्रपटामध्ये भाग्यश्री सोबत सलमान खान प्रमुख भूमिके मध्ये होता.

सलमानने सुद्धा या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये दमदार एंट्री घेतली होती‌.हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भाग्यश्री रातोरात स्टार झाली मात्र खूप कमी वयातच तिने हिमालय दासानी बरोबर विवाह केला व विवाहानंतर ती चित्रपट सृष्टी पासून दूर गेली व आपल्या संसारांमध्ये रमली.अनेक वर्षांनंतर भाग्यश्री पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात काम करत आहे.साऊथचा सुपरस्टार प्रभास च्या आगामी राधेश्याम या चित्रपटाची चाहते चांगलीच वाट पाहत आहेत.

या चित्रपटामध्ये 53 वर्षीय भाग्यश्रीने प्रभास च्या आईची भूमिका निभावली आहे.पडद्यावर जरी भाग्यश्रीने प्रभासच्या आईची भूमिका साकारली असली तरी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये भाग्यश्री आज सुद्धा खूपच बोल्ड दिसते.भाग्यश्री चार जन्म 1969 साली महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला होता.आज वयाच्या 53 व्या वर्षीसुद्धा भाग्यश्री आपल्या फिटनेस कडे खूप लक्ष देते व यामुळेच तिच्या आकर्षक फिगर व लुक्स मुळे आजच्या अभिनेत्रींनासुद्धा ती कडवी टक्कर देऊ शकते‌.

भाग्यश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते व ती नेहमीच आपली बोल्ड छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत असते व यातील बहुतांश छायाचित्रे ही बिकिनीमध्ये असतात.चाहत्यांना भाग्यश्रीची छायाचित्रे खूपच आवडतात.सोशल मीडियावर भाग्यश्रीचे अकरा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.सध्या भाग्यश्री आपला पती हिमालय दासानी सोबत स्मार्ट जोडि या सध्या टेलिव्हिजनवरील बहुचर्चित लोकप्रिय शो मध्ये सहभागी झाली आहे.हिमालय व भाग्यश्री यांची जोडी या शोमधील सर्वात महागडी व लोकप्रिय जोडी मानली जाते.