Home » चित्रपट सृष्टीला शोककळा! बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन…
Celebrities

चित्रपट सृष्टीला शोककळा! बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन…

बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेते आणि पटकथा लेखक शिव कुमार सुब्रमण्यम यांचे नि’ध’न झाले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. शिवकुमार यांच्या मृ’त्यू’चे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

शिवकुमार सुब्रमण्यम नुकतेच ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात सान्या मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत होती. याबरोबरच अभिनेता अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्येही दिसला आहे. शिवकुमार यांच्या पार्थिवावर ११ एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिव कुमार सुब्रमण्यम यांचा जन्म कोईम्बतूर येथे झाला. १९८९ मध्ये विधू विनोद चोप्रा यांच्या ‘परिंदा’ या चित्रपटाची पटकथा लिहिण्यापासून त्यांनी चित्रपटसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली. सुब्रमण्यम यांना हजारों ख्वैशीं ऐसी आणि परिंदा साठी सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट स्क्रिप्टचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

About the author

Being Maharashtrian