Home » यामी गौतमला आहे असा आजार ज्यावर कोणताही इलाज नाही,काय असतो हा ‘केराटोसिस पिलेरिस’ आजार? कशामुळे होतो?
Celebrities

यामी गौतमला आहे असा आजार ज्यावर कोणताही इलाज नाही,काय असतो हा ‘केराटोसिस पिलेरिस’ आजार? कशामुळे होतो?

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री यामी गौतम ही नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.तिचा साधा लूक चाहत्यांना खूप आवडतो एवढेच नाही तर चाहत्यांनी यामीला मुख्यतः बिना मेकअपमध्ये पाहिले आहे आणि यामीच्या या स्टाईलमुळे चाहते तिच्यासाठी वेडे झाले आहेत.अशा परिस्थितीत यामी गौतममध्ये सर्व काही परिपूर्ण आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

पण हा फक्त चाहत्यांचा विश्वास आहे कारण बॉलिवूडची ही सुंदर अभिनेत्री त्वचेच्या आजाराला तोंड देत आहे आणि याचा खुलासा स्वतः यामीने सोशल मीडियावर केला आहे.यामी गौतमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने सांगितले आहे की,तिला एका त्वचारोगाचा सामना करावा लागत आहे,ज्यावर कोणताही इलाज नाही.

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने तिच्या मनातील भीती आणि असुरक्षितता काढून एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे, अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा कुटुंबाला सांगितले आहे की तिच्या किशोरावस्थेपासून ती केराटोसिस पिलेरिस सारख्या त्वचेच्या समस्यांनी ग्रस्त आहे,ज्यावर कोणताही इलाज नाही.

यामीने पोस्टमध्ये लिहिले आहे की अलीकडेच मी ४ ऑक्टोबर फोटोशूट केले ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट ही केले.तेव्हा त्या फोटो वर तिने एक पोस्ट टाकली आहे त्यामध्ये तिने तिला असणाऱ्या त्वचेच्या समस्येबद्दल सांगितले आहे.ती म्हणते मी माझे फोटो क्लिक केले तेव्हा पोस्ट प्रोडक्शनमध्ये तिच्या फोटो वर बरीच प्रक्रिया करावी लागली.

तेव्हा ती म्हणते मला एक गोष्ट समजली की मला माझे हे आजारपण लपवता येणार नाही.त्यामुळे या विषयी सर्वांना सांगावे म्हणून जे रिअल आहे त्याचा स्विकार करावा असे मी ठरवले आहे.आणि ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे.पोस्टच्या शेवटी यामी गौतम लिहिते की डोळ्याखाली आलेले डाग एकसारखे करावे किंवा कंबरेचा वाढलेला घेर कमी करावा असे मला वाटत नाही,तरीही मला खुप चांगले वाटते.

त्यामुळे तुम्हाला जर अशा प्रकारची कोणती समस्या असेल तर त्या समस्येला स्वीकारावे आणि समोर जावे.आजार लपण्यापेक्षा त्यावर बोला त्यामुळे त्याबद्दल समजून घ्यायला मदत होते.

आता आपण केराटोसिस पिलेरिस हा आजार काय असतो आणि या आजारात काय होते ते जाणुन घेऊया…

१) हा एक त्वचेचाच आजार आहे यामध्ये त्वचा कोरडी पडते आणि त्वचेवर मुरुम,पुरळ येतात.

२) समजत नाही आपल्याला वाटते वॅक्सिंग मुळे डाग पडले असतील.

३) हात,मांडी गुडघे आणि हाताचे कोपर याठिकाणी त्वचा कोरडी पडते आणि पुरळ येते.

४) वातावरणानुसार याचे प्रमाण कमी-जास्त होते.

५) शरीरातील केरोटीन नावाचा घटक ज्या भागात जास्त आहे तिथे ही समस्या उद्भवते.

६) मॉइश्चरायझर मुळे त्वचेवर असणारा कोरडेपणा कमी होतो.

६) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार क्रीम घ्याव्यात त्याने ही समस्या कमी होण्यास मदत मिळते.