Home » शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यासमोर लोकांची गर्दी…घराबाहेर पोस्टर लावत म्हणाले…
Celebrities

शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यासमोर लोकांची गर्दी…घराबाहेर पोस्टर लावत म्हणाले…

बॉलीवूड चा सुपरस्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान चांगल्याच अडचणीत आला आहे.मुंबईमध्ये क्रूझवर सुरु असलेल्या ड्र’ग्ज पार्टीमधून अटक केलेल्या आर्यन खान सह मूनमून धमेचा,नूपुर सारिका,इस्मित सिंग,मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर,गोमित चोप्रा,अरबाझ मर्चंट न्यायालयाने या सर्व आरोपींना सोमवारी ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कस्टडी सुनावण्यात आली आहे.

यामुळे शाहरुख खान खुप चिंतेत आहे त्यामुळे त्याला धीर देण्यासाठी सलमान खान आणि इतर सेलिब्रिटी भेट घेतली आणि तसेच शाहरुख चे फॅन्स देखील त्याच्या या परिस्थितीत त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

शाहरुखच्या मन्नत या बंगल्याच्या बाहेर त्याचे अनेक चाहत्यांनी गर्दी केली आहे त्याला पाठींबा देण्यासाठी पोस्टर घेऊन जमा झाले आहे.’आम्ही सर्व फॅन्स तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि या कठीण वेळेत आम्ही तुझ्या पाठिशी आहोत,काळजी घे’ असा मॅसेज लिहलेली पोस्टर हातात घेऊन शाहरुखच्या फॅन्स मन्नत बाहेर उभे आहेत.

दिग्दर्शक हंसल यांनी असे लिहले की जेव्हा मुलगा अडचणीत सापडतो तेव्हा त्यामधून मार्ग काढणे आईवडिलांसाठी खुप त्रासदायक आणि कठीण असते. न्यायव्यवस्थेच्या अगोदर लोकत्याबद्दल काहीही निष्कर्ष काढतात,तेव्हा ते खुपच अवघड जातं.हा पालक आणि मुलांच्या नात्याचा अनादर आहे.एस आर के मी तुझ्यासोबत आहे,असे म्हणत त्यांनी शाहरुखचे समर्थन केले.

त्याचबरोबर अभिनेत्री पुजा भट्ट हिने देखील ट्विट केले त्यामध्ये ती म्हणते की,”मी पण तुझ्या सोबत आहे तुला आमची गरज आहे अशातला काही भाग नाही,तरी देखिल माझा तुला पाठिंबा आहे.ही वेळ निघून जाईल”अस म्हणत तिने सुध्दा शाहरुख ला पाठिंबा दिला.