Home » जुही चावलाला लोकांनी पैशासाठी म्हाताऱ्या व्यक्तीसोबत लग्न केले असे टोमणे मारले,परंतु लग्न करण्यामागे आहे वेगळेच कारण…
Celebrities

जुही चावलाला लोकांनी पैशासाठी म्हाताऱ्या व्यक्तीसोबत लग्न केले असे टोमणे मारले,परंतु लग्न करण्यामागे आहे वेगळेच कारण…

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला ८०-९० च्या दशकामध्ये लोंकाच्या हृदयावर राज्य करायची.जुही चावला ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री फिल्म प्रोड्युसर आणि मॉडेल आहे.तिने १९८६ ला ‘सल्तनत’ या चित्रपटापासुन तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.जुही चावलाने तामिळ,तेलुगू,बंगाली,पंजाबी,मल्याळम आणि कन्नड अशा अनेक भाषेतील चित्रपटांबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

१९८४ मध्ये जुही चावला मिस इंडियाचा किताब जिंकली होती त्याबरोबरच १९८४ मध्येच मिस युनिव्हर्स बेस्ट कॉसटयूम पुरस्कार देखील जिंकला आहे.जुही चावलाने बिझनेसमॅन जय मेहता यासोबत लग्न केले त्यांना दोन मुले देखील आहे.स्वतःच्या करियर बद्दल पारदर्शी असणारी जुही नेहमी तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलणे टाळते.

परंतु तिचे वैयक्तिक आयुष्य देखील एखाद्या चित्रपटाच्या कथे सारखेच आहे.जुही चावलाने १९८६ मध्ये ‘सल्तनत’ चित्रपटापासून तिच्या करियरची सुरुवात केली. परंतु हा चित्रपट अपयशी ठरला. त्यानंतर तिने साऊथ चित्रपटात काम केले तिला तिकडे चांगले यश मिळाले.साऊथ मधील लोकप्रियतेमुळे तिला १९८८ ला ‘कयामत से कयामत तक’ ह्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

या चित्रपटाने एका रात्रीत अमीर खान आणि तिला स्टार बनवले. त्यानंतर तिने कधी मागे वळून नाही बघितले.करियरच्या शिखरावर असतांनाच तिने जय मेहताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे खुप जणांना ध’क्का बसला.जय मेहताचे अगोदर लग्न झालेले होते त्यांच्या पहिचे निधन होऊन थोडेच दिवस झाले होते.त्यामुळे त्या दोघांच्या लग्नाच्या निर्णयाने सगळे जण चकित झाले होते.

जय मेहताचे लग्न बिर्ला परिवातील मुलीशी झाले होते.यश बिर्ला यांची बहीण सुजाता बिर्ला हिच्याशी जय मेहताचे लग्न झाले होते सुजाता यांचे बंगळुरू विमान अ’प’घा’ता’त १९९० मध्ये नि’ध’न झाले.तेव्हा जय मेहता यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

दिग्दर्शक राकेश रोशन यांनी ‘कारोबार’ चित्रपटाच्या वेळी जय मेहताशी ओळख करून दिली होती.तेव्हा जय मेहता हे त्यांच्या संसारिक जीवनात खुप आनंदी होते.त्यावेळी जुहीने तिच्या करियरला नेमकीच सुरुवात केली होती.

जय मेहता त्यांच्या पत्नीच्या नि’ध’नामुळे पूर्णपणे तुटले होते.तेव्हा अशा कठीण काळामध्ये जुही चावलाने एका मित्राप्रमाने त्यांना पाठिंबा दिला त्याचकाळात जुही चावलाच्या आईचे नि’ध’न झाले तिच्या आईचे कार अपघातामध्ये नि’ध’न झाले होते तेव्हा जुही चावला वर पण दुःखाचा डोंगर कोसळला होता.

तेव्हा जय मेहताने तिला मित्र म्हणून सांभाळले.दोघांच्या जीवनात दुःख आले होते त्यांनी एकमेकांना या परिस्थितीत सांभाळले. दुःखा मध्ये त्यांनी दोघांनी एकमेकांना साथ दिली होती आणि ते एकमेकांचे चांगलेच मित्र बनले होते.त्यावेळी त्यांना त्यांच्या एकमेकांवर असणाऱ्या प्रेमाची जाणीव झाली आणि त्यांनी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

१९९५ मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि गु’प्त समारंभात त्यांनी दोघांनी लग्न केले.यांची मुलगी जान्हवी हिचा जन्म २००१ ला  झाला आणि नंतर दोन वर्षांनी २००३ ला मुलगा अर्जुन याचा जन्म झाला.जय मेहता आणि जुही चावला यांच्या जोडीबद्दल लोकांनी खुप अफवा पसरवल्या आहे.

परंतु या दोघांनी त्यांच्या जीवनात खुप सारी दुःख बघितले.त्या दुःखामध्ये दोघांनी एकमेकाला आधार दिला आणि एकमेकांचे दुःख वाटून घेतले.लोक काहीही म्हणो पण जय मेहता आणि जुही चावला यांची जोडी एकदम परफेक्ट आहे.