Home » चित्रपटामध्ये काम न करता देखील करिश्मा कपूर करते दोन मुलांचा सांभाळ,येथून मिळतात लाखो रुपये…
Celebrities

चित्रपटामध्ये काम न करता देखील करिश्मा कपूर करते दोन मुलांचा सांभाळ,येथून मिळतात लाखो रुपये…

अभिनेत्री करिष्मा कपूर ही गेली अनेक वर्ष रुपेरी पडद्यापासून दूर आहे.एक काळ होता जेव्हा करिष्मा कपूर ही बॉलिवूडमधील सुपरस्टार मानली जात असे व वर्षात तिचे तीन ते चार चित्रपट प्रदर्शित होत असत.गोविंदा व डेव्हिड धवन यांच्यासोबत करिश्माने अनेक सुपरहिट विनोदी चित्रपट सुद्धा केले.आपल्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच वैयक्तिक आयुष्याच्या बाबतीतही ती नेहमीच चर्चेत राहिली.

कपूर खानदानाच्या मुली किंवा सुना चित्रपट क्षेत्रात जात नाही असा एक अलिखित नियम होता याला छेद दिला तो करिश्मा कपूरने .तिच्या या निर्णयामुळे तिच्या आई-वडिलांना विभक्त व्हावे लागले मात्र या प्रसंगी करिश्माची आई बबिता कपूर तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली व सुरुवातीला चित्रपट सृष्टी मध्ये स्थिरावण्यासाठी तिला जो संघर्ष करावा लागला त्यामध्ये सुद्धा तिची साथ दिली.सुरुवातीला करिष्मा च्या वाट्याला काही दर्जाहीन भूमिका सुद्धा आल्या मात्र त्या सुद्धा तिने स्वीकारल्या व स्वतःचे एक वेगळे स्थान नंतरच्या काळात निर्माण केले.

करिष्मा च्या आयुष्यातील पुरुष हेसुद्धा एक चर्चेचा विषय होते.अजय देवगण,अभिषेक बच्चन यांच्यासोबत करिष्मा चे नाव जोडले गेले.अभिषेक बच्चन सोबत तर करिष्माचा साखरपुडाही झाला होता मात्र ऐनवेळी काही गोष्टींमुळे हा विवाह मोडला गेल्यावर अगदी अल्पावधीतच करिश्माने दिल्लीस्थित व्यावसायिक संजय कपूर सोबत विवाहाची गाठ बांधली.मात्र सुरुवातीपासूनच या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते.

संजय कपूर ने आपल्या मित्रा जवळ आपली बोली लावल्याचे आरोपही करिश्माने केले आहेत.तसेच या विवाहामध्ये तिला मानसिक व शारीरिक दोन्ही प्रकारचे त्रास झाले असे सुद्धा तिने सांगितले.या सर्व त्रासामधून बाहेर पडण्यासाठी करिश्माने संजय पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला व ती आता स्वतंत्रपणे आपल्या मुलांसोबत राहत आहे.

करिश्माला दोन मुले आहेत.मुलगी समायरा व मुलगा कियान यांच्यासोबत करिष्मा मुंबईमध्ये राहते.करिष्मा कोणत्याही चित्रपटामध्ये किंवा मालिकेमध्ये दिसत नाही तरी ती आपल्या मुलांचा व आपला खर्च कसा भागवते हा प्रश्न अनेकांना पडतो.करिश्माने घटस्फोट घेतेवेळी संजय कपूर ने तिला भरगच्च अशी पोटगी दिली आहे.संजय कपूर आणि करिश्मा यांचा घटस्फोट हा महागड्या घटस्फोटां पैकी एक मानला जातो.

करिश्माला ती सध्या राहात असलेला फ्लॅट संजय कपूर ने दिलेला असून तिच्या मुलांचा खर्चही संजय कपूर उचलतो. दोन्ही मुलांचे शिक्षण व अन्य खर्च संजय कपूर कडून पुरवले जातात व या व्यतिरिक्त करिश्माला दरमहा दहा लाख रुपये इतकी रक्कम या मुलांच्या खर्चासाठी मिळते.