Home » हा अभिनेता करणार पुनीत राजकुमार यांचे अधुरे स्वप्न पूर्ण…
Celebrities

हा अभिनेता करणार पुनीत राजकुमार यांचे अधुरे स्वप्न पूर्ण…

चित्रपटसृष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी एकमेकांमध्ये प्रचंड चुरस व स्पर्धा दिसून येते.मात्र काही अभिनेते हे सर्वांच्या हृदयात राज्य करताना दिसून येतात या व्यक्तींचा सर्वच आदर व सन्मान करत असतात.या व्यक्तींना सर्व जण मित्र मानत असतात.अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार होय.पुनीत राजकुमार हे केवळ कन्नड चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार नव्हते तर सामाजिक कार्यांमध्ये नेहमीच अग्रेसर राहणारे व्यक्तिमत्व होते.पुनीत राजकुमार यांनी आणि अनेक गोशाळा,अनाथ आश्रम यांची स्थापना केली होती.

या बरोबरीने त्यांनी गेल्या वर्षभरापासून अठराशे मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलली होती.पुनीत राजकुमार यांच्या अशा अचानक जाण्याने सामाजिक पोकळी निर्माण झाली आहे. या मुलांच्या शिक्षणाची चिंता निर्माण झाली होती.मात्र विशाल या कन्नड अभिनेत्याने पुढे सरसावत आपला मित्र पुनीत राजकुमारचे हे कार्य चालू ठेवण्याचे ठरवले आहे व त्या दृष्टीने या अठराशे मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलण्यास त्यांनी पुढाकार घेतला आहे.

पुनीत राजकुमार हे विशाल यांचे खूप चांगले मित्र होते व विशाल यांनी पुनीत राजकुमार यांचे या मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले आहे तशी घोषणा त्यांनी अधिकृतपणे नुकतीच केली आहे.तेव्हा पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना विशाल खूप भावुक झाला होता.

पुनीत राजकुमार यांच्या जाण्यामुळे त्यांचे चाहते व समाज या दोन्हींमध्ये ही एक प्रकारची पोकळी निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशाल हे आगामी अनिके या थ्रिलर चित्रपटामध्ये झळकणार आहेत. या संबंधित पत्रकार परिषदेत त्यांनी पुनीत राजकुमार यांचे कार्य पुढे चालवण्यासंबंधी घोषणा केली आहे.